Wednesday, 20 October 2021

पिंपरी चिंचवडमधील 'त्या' कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा, राऊतांनी थेट सोमय्यांना लिहिले पत्र !!

पिंपरी चिंचवडमधील 'त्या' कंपनीचा 500 कोटींचा घोटाळा उघड करा, राऊतांनी थेट सोमय्यांना लिहिले पत्र !!


भिवंडी, दिं,21, अरुण पाटील (कोपर) :
           तुम्ही दररोज वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आरोप करत असतात. त्यामुळे एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे.
           भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या रोज आपल्या पोतड्यातून या ना त्या नेत्यां विरोधात आरोपांची राळ उडवतात. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमय्यांनाच पत्र लिहून दणका दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये स्मार्ट सिटीच्या नावाखाली 500 कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा दावा राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून दोन पत्रच सोमय्यांना लिहिलं आहे. या प्रकरणी ईडी आणि सीबीआयकडून चौकशी व्हावी अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.
           तुम्ही दररोज वेगवेगळ्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणावर आरोप करत असतात. त्यामुळे एका महत्त्वाच्या प्रकरणाचा तुमच्याकडे पाठपुरावा करत आहे. काही दिवसांपूर्वीच मी पिंपरी चिंचवडचा दौरा केला होता, त्यावेळी काही महत्त्वाची आणि गंभीर कागदपत्र हाती लागली. त्यानुसार, 2018-19 मध्ये स्मार्ट सिटी योजनेसाठी क्रिस्टल इंटरग्रेटडे सर्व्हिस लिमिटेड  कंपनीला ५०० कोटींचे कंत्राट देण्यात आले होते', असा दावा राऊत यांनी केला आहे.
           या कंपनीला 500 कोटींचे कंत्राट देण्यात आले होते पण त्यांनी 50 टक्के सुद्धा काम केले नाही. त्यामुळे या कंपनीने स्पष्टपणे सरकारचा आणि जनतेचा पैसा हा पाण्यात बुडवला आहे. या कंपन्यांनाच कंत्राटाचा फायदा झाला आहे, त्यामुळे तुम्ही या प्रकरणाची ईडीकडे चौकशीसाठी मागणी करावी', अशी मागणीच राऊत यांनी सोमय्यांकडे केली आहे.
             या प्रकरणाचे संपूर्ण पुरावे आणि कागदपत्र हे तुम्हाला देतो. या कंपनीने मोठा गैरव्यवहार केला आहे. या प्रकरणी तुम्ही नेहमीप्रमाणे ईडीकडे चौकशीसाठी मागणी करून एका मोठ्या प्रकरणाचा खुलासा कराल', अशी अपेक्षाही राऊत यांनी सोमय्यांकडे व्यक्त केली.

No comments:

Post a Comment

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !

युद्ध नको आम्हा बुद्ध हवा' कविता संग्रहाचे प्रकाशन !           सध्या सर्वत्र सुरू असलेल्या बहुचर्चित विषयावरील आयुष्यमान धना...