Friday 1 October 2021

पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधितांसाठी ठाणे जिल्ह्याला सुमारे त्रेचाळीस कोटींचा निधी, तर कल्याण ला तेरा कोटी एकसष्ठलाख?

पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधितांसाठी ठाणे जिल्ह्याला सुमारे त्रेचाळीस कोटींचा निधी, तर कल्याण ला तेरा कोटी एकसष्ठलाख?


कल्याण, (संजय कांबळे) : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या बाधित कुंटूबियांना मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये ठाणे जिल्ह्यासाठी सुमारे ४२ कोटी ९० लक्ष ९४ हजार इतकी रक्कम राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून देण्यात आली आहे त्यामुळे लाभार्थ्यांची दिवाळी दसरा आंनदात साजरी होईल.


जुलै २०२१ मध्ये राज्यात पुर, चक्रीवादळ आदी नैसर्गिक आपत्ती आली. यामध्ये जिवीतहानी बरोबरच, घरे, जनावरे, शेती, मत्स्यव्यवसाय, कुक्कुटपालन,दुकानदार, टपरीधारक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. ठाणे जिल्ह्यातील, ठाणे, मिरा भाईंदर, कल्याण, भिवंडी, अंबरनाथ, उल्हासनगर, मुरबाड व शहापूर आदी तालुक्याला देखील जोरदार फटका बसला. अनेक ठिकाणचे नुकसान पंचनामे झाले असल्याने विविध राजकीय पक्ष, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, आदीनी बाधित झालेल्या नुकसानग्रस्त लाभार्थ्यांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. यामध्ये मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जयराम मेहेर, सरचिटणीस राम सुरोशे, सेवादलचे जिल्हाउपाध्यक्ष संतोष शेलार, विलास सोनवणे, आदीचा समावेश होता.


त्यामुळे राज्यात अतिवृष्टीमुळे विविध जिल्ह्यात उदभवलेल्या पुरपरिस्थितीमुळे मृत जनावरे, पुर्णत/अंशत पडझड झालेली कच्ची घरे, पक्की घरे, झोपडी, गोठे, मत्स्य बोटी व जाळ्यासाठी अर्थसहाय्य, मत्सयबीज, शेतीसाठी अर्थसहाय्य, दुकानदार, टपरीधारक व कुक्कुटपालन, शेडच्या नुकसानीसाठी मदत व इतर अनुदेय बाबीकरीता बांधितांना मदतीचे वाटप करण्याकरीता राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून विभागीय आयुक्त यांनी ठाणे जिल्ह्याकरीता एकूण ४२ कोटी, ९० लक्ष ९४ हजार एवढा निधी वितरीत केला आहे.यामध्ये घरे,कपडे,भांडी, वस्तू यासाठी ३५ कोटी, ४ लाख ५५ हजार, मृत जनावरे १० लाख ४३ हजार, पुर्णत/अंशत ३ लक्ष २७ हजार, शेतजमीन नुकसान, २२ लाख, दुकानदार ६ कोटी ७२ लाख ७२ हजार, टपरीधारक १५ लाख, ४० हजार कुक्कुटपालन ३५ हजार, याचा समावेश करण्यात आला आहे.


विविध लेखाशिर्षाखाली जिल्ह्यातील ८ तालुक्यांंना सुमारे ३५ कोटी, ४ लाख ५५ हजार रुपये इतके अनुदान प्राप्त झाले आहे. यामध्ये ठाणे ५ हजार रुपये, मिरा भाईंदर, शुन्य, कल्याण १३ कोटी,६१ लक्ष, ५ हजार रुपये, भिवंडी ८ कोटी ८६ लक्ष ३० हजार, अंबरनाथ २ कोटी २६ लाख १५ हजार, शहापूर ३४लाख ७० हजार, मुरबाड ६९ लाख ४० हजार असे एकूण २५ कोटी ७७ लाख ६५ हजार इतके अनुदान वितरित करण्यात आले आहे. मृत जनावरे १० लाख ३१ हजार यामध्ये भिंंवडी तालुक्याला सर्वाधिक म्हणजे ८ लक्ष १ हजार तर सर्वात कमी शहापूर तालुक्याला केवळ ६०हजार रुपये. वाढीव दराने ३ लाख २७ हजार ऐवढे आहे.

पुर्णत/अंशतः पडझड झालेली कच्ची/पक्की घरे, झोपडी, गोठे साठी प्राप्त अनुदान २७ लक्ष १५ हजार रुपये यामध्ये वितरित केलेले १ लक्ष ०८ हजार, कल्याण १ लाख १ हजार १०० रुपये, भिवंडी १५ लाख ८७ हजार९००, उल्हासनगर, शहापूर ८ लाख ७१ हजार ५०० रुपये, मुरबाड ४६ हजार ५०० इतके तर वाढीव दराने ३५ लक्ष ७ हजार ऐवढे वितरित करण्यात आले. शेतजमीन नुकसानसाठी २२ लाख रुपये वितरित केले आहे. यामध्ये शहापूर तालुक्याकरीता ५ लक्ष तर मुरबाड साठी १७ लाख रुपये देण्यात आले आहेत. दुकानदाराकरीता ६ कोटी ७२ लाख ७२हजार तर टपरीवाल्यासाठी १५ लक्ष ४० हजार आणि कुक्कुटपालन व शेडच्या नुकसानीसाठी ३५ हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे. अशा प्रकारे सुमारे ४२ कोटी ९० लक्ष ९४हजार रुपये अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. त्यामुळे, कल्याण, मुरबाड, शहापूर, भिंवडी, अंबरनाथ, उल्हासनगर, ठाणे, मिरा भाईंदर, आदी भागातील पुरग्रस्त नांगरीकांच्या जिवनात दिवाळी दसरा थोडेफार आंनदाचे क्षण घेऊन येईल यात शंका नाही.

**मा श्री राजेश नार्वेकर (जिल्हाधिकारी, ठाणे) :- जिल्ह्यातील बाधित तालुक्यांंना मागणी प्रमाणात निधी वितरित करण्यात आला आहे. संबंधित तहसीलदांंराना अटी व शर्ती च्या अधीन राहून लाभार्थ्यांना मदत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

No comments:

Post a Comment

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !!

निवडणूक कामासाठी जुंपलेल्या आशा अंगणवाडी शिपाई कर्मचाऱ्यांची कमी मानधनावर बोळवण !! चोपडा, प्रतिनिधी.. महाराष्ट्रात लोकसभेच्या नि...