Friday, 1 October 2021

तरुण विकास मंडळ वाटद-मिरवणे मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना केलं शैक्षणिक साहित्य वाटप !!

तरुण विकास मंडळ वाटद-मिरवणे मंडळाचा स्तुत्य उपक्रम ; गणेशोत्सवात विद्यार्थ्यांना केलं शैक्षणिक साहित्य वाटप !!


कोकण, ( दिपक कारकर ) :

विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून महत्वपूर्ण अशा शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच योगदान देणाऱ्या तरुण विकास मंडळ ( वरच्या तिन्ही वाडी ) नोंदणीकृत वाटद-मिरवणे ता.जि. रत्नागिरी या मंडळाचा "शैक्षणिक साहित्य वाटप" कार्यक्रम रविवार दि. १२ सप्टेंबर २०२१ रोजी पार पडला.

जगावर असणारे कोव्हिड-१९ चे भिषण संकट, त्याचबरोबर शिक्षण क्षेत्र पूर्णपणे निष्प्रभ झालेले असताना शालेय मुलांना कुणीतरी कौतुकास्पद धीर देणे आवश्यक होते. गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळाच्या सर्व सभासदांच्या उपस्थितीत शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम पार पाडण्याचा उद्देश तरुणांनी पूर्णत्वास नेत सामाजिक सलोखा जोपासला.
     
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांना पुष्पांजली वाहून करण्यात आली. त्याचबरोबर, निसर्ग संवर्धनाचे प्रतिक म्हणून मान्यवरांच्या हस्ते "वृक्षारोपण" देखील करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक कु.अमोल बारगुडे यांनी करत शैक्षणिक फंडाचे उद्दिष्ट व कार्य याविषयी विवेचन व्यक्त केले.
     
उपरोक्त मंडळाचे सचिव हरिश्चंद्र पालये, खजिनदार रमेश पातये व प्रमुख सल्लागार केशव पालये यांच्या हस्ते वाडीतील ७४ विद्यार्थ्यांना (अंगणवाडी ते पदवी शिक्षण) शालेय बॅग, वही-पेन व वृक्षरोप यांचे वाटप करण्यात आले.यावेळी मोहिनी मुरारी मयेकर महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा सुभाष पालये यांनी सर्व विद्यार्थ्यांना "आजचे शिक्षण व आपण" या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
    
या उपक्रमाला वाडीतील ग्रामपंचायत सदस्य सचिन ढवळे,मंडळाचे सर्व सदस्य, महिला वर्ग (पालक), तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
     
संगणकीय, बदलत्या युगात शिक्षण म्हणजे काळाची गरज आहे, हे जाणून उद्याचा भारत घडविण्यासाठी नवप्रेरणादायी सुरुवात मंडळाने करत एक नवा आदर्श विद्यार्थ्यांना दिला आहे. अनेकांकडून या स्तुत्य उपक्रमाचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !

'पडघे ' गावात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाऊलखुणा !  आमच्या आयुष्याचं केलं सोनं  देहाचे झिजून केले चंदन... ज्ञानाच्या महासागराला  अ...