Wednesday, 13 October 2021

भिवंडी मनपाच्या मुख्यालयात ए टी एमची व्यवस्था करण्याची भिवंडी म्युन्सीपल कर्मचारी युनीयनची मागणी !!

भिवंडी मनपाच्या मुख्यालयात ए टी एमची व्यवस्था करण्याची भिवंडी म्युन्सीपल कर्मचारी युनीयनची मागणी !!


भिवंडी, दिं, अरुण पाटील (कोपर) :
         भिवंडी महानगर पालिका मुख्यालयाच्या आवारात कामगांराना ए टी एमची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी भिवंडी म्युन्सीपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष राजेंद्र काबाडी व सचिव सुनिल वंगार यांनी लेखी निवेदनाद्वारे आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडे केली आहे.
         मनपा कर्मचाऱ्यांना उशीरा मिळत असलेले वेतन अदा झाल्यानंतर ते काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना विशेषतः महीला कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत असुन वेळप्रसंगी प्रवासही करावा लागत आहे त्यामुळे मुख्यालयाच्या आवारातील प्रभाग क्रमांक १ ते ५ या ठिकाणी कामगांराना एटीएम बसवून सुविधा देण्याच्या सुचना वेतन अदा करणाऱ्या बॅंकेला आयुक्तांनी द्याव्या किंवा अशा बॅकेतच खाती उघडावीत जी अशा प्रकारच्या सुविधा कामगांराना देऊ शकतील त्यामुळे कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होईल अशी मागणी निवेदनात करण्यात आली असुन बॅक ऑफ महाराष्ट्र ही कामगांराना अपेक्षीत सोयी सुविधा पुरविण्यास तयार असुन अनेक कामगांरानी या बँकेत खाती उघडली आहेत. आयुक्त यांनी त्यांच्या कडे पगार अदा करण्यात सुरुवात केल्यास कामगांराना विवीध सुविधा उपलब्ध होतील असेही निवेदनात नमुद करण्यात आले असुन आयुक्त काय निर्णय घेतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !!

उरणमध्ये सम-विषम तारखेनुसार पार्किंग नियम लागू !! ** नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरातील वाह...