Sunday, 10 October 2021

१५ व्या स्वाभिमान भारत कप आँल इंडिया ओपन ई काता चँम्पियनशिप-२१ मध्ये रितिका भोसले ठरली सुवर्ण पदकाची मानकरी !!

१५ व्या स्वाभिमान भारत कप आँल इंडिया ओपन ई काता चँम्पियनशिप-२१ मध्ये रितिका भोसले ठरली सुवर्ण पदकाची मानकरी !!


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
           ईशान्य मुंबईतील विक्रोळी पार्क साईट येथील रहिवाशी डाँ.सुहास भोसले व शिक्षिका रीता सु.भोसले यांची कन्या रितिका सुहास भोसले हिने १५ व्या स्वाभिमान भारत कप आँल इंडिया ओपन ई काता  चँम्पियनशिप-२१ मध्ये १८-१९ वयोगटात उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण पदक (गोल्ड मँडल) जिंकले. इंटरनॅशनल इंडो रयु कराटे डू फेडरेशन ने २ ऑक्टोबर २०२१ रोजी ही स्पर्धा आयोजित केली  होती. इंटरनेशनल इंडो रयुकराटे डू फेडरेशन चे कोच फ्रांज शेख सर यांच्या मार्गदर्शन खाली रितिकाने हे यश संपादन केले. रितिका सु.भोसले हिने सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल तिचे विक्रोळी पार्क साईट परिसरातील जनतेकडून कौतुक होत असून अनेकांनी तिला या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अभिनंदनासह शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”.

“सिंग्रोबा धनगर—खंडाळा घाटाचा मार्गदर्शक, देशभक्तीचा दीपस्तंभ”. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला खंडाळा घाट आज आपल्या दैनंदिन प्रवासाच...