जांभूळ ग्रामस्थांची दिवाळी गोड, सरपंच परिक्षित पिसाळ यांना 'नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड पुरस्कार! कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा!
कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील ग्रुप
ग्रामपंचायत जांभूळ चे तरुण तडफदार सरपंच परिक्षित हिराजी पिसाळ यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना जागतिक किर्तीच्या नेल्सन मंडेला नोबल पीस अँवार्ड अँकेडमी तर्फे सन २०२१ या वर्षासाठीचा नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड, हा पुरस्कार जाहीर झाला असून नुकताच मुंबई येथे झालेल्या एका शानदार समारंभात विविध मान्यवरांच्या हस्ते तो प्रधान करण्यात आला. त्यामुळे समस्त जांभूळ ग्रामस्थांची दिवाळी गोड झाली आहे. तर हा पुरस्कार म्हणजे कल्याण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे बोलले जात आहे.
कल्याण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत जांभूळची स्थापना २७ मार्च १९९२ रोजी झाली आहे. उल्हास नदीच्या काठावर वसलेल्या या गावाचा मुख्य व्यवसाय शेती हाच आहे,सुरुवातीचे काही वर्षे ही कुरघोडी च्या राजकारणात गेली असली तरी १५ जानेवारी २०२१ रोजी ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक झाली, ८ फेब्रुवारी ला सरपंच उपसरपंच निवड होऊन सरपंच पदी, तरुण, सुक्षिशीत, सकारात्मक विचारांचे परिक्षित हिराजी पिसाळ, तर उपसरपंच पदी सुनिता सुरेश गोरे यांची निवड झाली. तसेच सदस्य म्हणून सुमन पिसाळ, ज्योती जाधव, गुलाब मुकणे, रेखा गायकवाड, अशोक शिंदे, अक्षय सावंत आणि राजाराम मुकणे हे निवडून आले.
सरपंच परिक्षित पिसाळ हे मागील पंचवार्षिक मध्ये उपसरपंच होते, तसेच राजकारणातील धुंरदर तसेच समाजसेवक नाना पिसाळ यांच्या कुटुंबातील ते असल्याने ते सामाजिक जिणीवेतूनच सरपंच पदावर विराजमान झाले होते.
साधारण पणे २ हजारच्या आसपास लोकवस्ती असलेल्या जांभूळ गावातील अतंर्गत रस्ते, गटारे, शौचालय, फेवरब्लाँक, आदी कामे प्राधान्याने केली. २५० च्या आसपास असलेल्या आदीवासी समाजासाठी ठक्कर बाप्पा योजनेतून मंगल कार्यालय, २०० लोकवस्ती असलेल्या मागासवर्गीयासाठी, समाजहाल, बांधले, गावातील तरुण मंडळीना व्यायामाची सवय लागावी, ते व्यसनाधीनतेकडे वळू नयेत म्हणून ३ सुसज्ज जिम बांधण्यात आली तर वयोवृद्धासाठी ओपनजिम तयार करण्यात आली. ऐवढेच नव्हे तर तालुक्यातील पहिली मँटवरील कबड्डी ही याच गावात सुरू झाली. गावातील महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा, तसेच कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे म्हणून महिला भवन, तीन कलामंच निर्माण केले.
सरपंच परिक्षित पिसाळ, उपसरपंच सुनिता गोरे व सदस्य आणि प्रशासनाची बाजू उत्तम पणे सांभाळणारे ग्रामसेवक बाळू कोकणे यांनी २०१८ पासून गावाला वाहून घेतले जेष्ठ नेते नाना पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गावविकासाचा विडा उचललेल्या सरपंच पिसाळ यांनी संपूर्ण गाव सीसीटीव्ही युक्त केले, ग्रामपंचायतीची स्वतः ची वेबसाईटवर निर्माण करणे संपूर्ण व्यवहार पारदर्शक ठेवला, लोकसहभागातून कित्येक वर्षे रखडलेल्या स्मशानभूमी व गणेश घाट बांधून हा प्रश्न सोडविला, संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कच-यांचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असताना जांभूळ गाव मात्र कचरामुक्त गाव म्हणून ओळखले जाते. देशाचे भावी नागरिक घडविणा-या शाळेसाठी व मुलासाठी वाचनालय तयार करून आजमितीस त्यामध्ये अडीच ते ३ हजार पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. गावात १०० टक्के नळजोडणी केली असून २४ तास पाणी पुरवठा सुरू आहे. तसेच भविष्यात सर्वांना मिटर व्दारे पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. अशा या गावाच्या सरपंचाच्या सामाजिक कार्याची दखल नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड अँकेडमी चे अध्यक्ष राजकुमार तक यांनी घेतली. व सन २०२१चा नेल्सन मंडेला नोबेल पीस अँवार्ड पुरस्कार सरपंच परिक्षित पिसाळ यांना जाहीर केला. तो पुरस्कार वितरण समारंभ मुंबई येथे नुकताच आयोजित करण्यात आला होता. यावेळी इजराईल चे जनरल काँन्सुलेट कोब्बी शोशानी, डॉ गुल क्रिपलानी, अध्यक्ष राजकुमार तक,यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी सिनेअभिनेत्री डॉ आदीती गोवित्रीकर, संगीतकार अनू मलिक, उत्तरप्रदेशचे आमदार ब्रीजभूषण राजपूत, गायिका महालक्ष्मी अय्यर, आदी मान्य वर उपस्थित होते.
दरम्यान हा पुरस्कार अंत्यत मानाचा मानला जातो, मागील वर्षी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भावाला जाहीर झाला होता. तर या वर्षी तो सरपंच परिक्षित पिसाळ यांना लाभला आहे, त्यामुळे ही समस्त जांभूळ ग्रामस्थांनसाठी अभिमानास्पद बाब असून ऐतिहासिक कल्याण तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीचे सदस्य, ग्रामसेवक बाळू कोकणे, जनाधार निर्भीड पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय कांबळे, कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी आदीनी त्यांचे अभिनंदन केले आहे.





No comments:
Post a Comment