Saturday 27 November 2021

कल्याण येथील आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांची एसटी बसेसवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिली प्रतिक्रिया !!

कल्याण येथील आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांची एसटी बसेसवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात दिली प्रतिक्रिया !!


कल्याण, बातमीदार : एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही आगारांमधील एसटी वाहतूक सुरू झाली आहे.

तर, दुसरीकडे अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव आगाराच्या तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी बस चालक जखमी झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. राज्यातील काही आगारांमध्ये पुन्हा एकदा एसटी धावण्यास सुरुवात झाली आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण या आगारामध्ये वाहतूक सुरू झाली आहे.


कल्याण येथील आगार व्यवस्थापक विजय गायकवाड यांनी राज्यात एसटी बसेसवर झालेल्या हल्ल्या संदर्भात दिलेली अतिशय संवेदनशील प्रतिक्रिया :-

असे कृत्य करणारे महणजे स्वतःच्या आईवर बलात्कार करणारे नराधम !

ज्या एसटीला हे कर्मचारी आपली मायमाऊली , अन्नदाती समजतात, तीच्यावरच दगड उचलताना जराही खाल्या मिठाची जाणीव का झाली नाही? एसटी टीकावी म्हणून एकिकडे विलीनीकरणासाठी गळे काढायचे, अन् ज्या एसटीच्या जीवावर आत्ता पर्यंत जगलो तीचाच विध्वंस करायचा ही कसली संवेदना ? ही कसली माणूसकी ?

ही कसली वृत्ती ही तर विकृती आहे. आंदोलनं, संप ही लोकशाहीने, भारतीय संविधानाने दिलेली लढण्याची शक्ती आणि शस्त्र आहे. त्याचा वापर संविधानीक पध्दतीनेच झाला पाहिजे. कायदा हातात घेवून, मारझोड, तोडफोड तेही आपल्याच मालमत्तेचा विध्वंस करुन काय साध्य करायचे आहे ? ज्यांना संपक-यांची भूमिका मान्य असेल ते संपात राहतील, ज्यांना मान्य होणार नाही ते कामावर परततील, म्हणून जर कोणी, आपल्या लालपरीवर, आपल्या अन्नदात्रीवर दगड उचलणार असतील तर हा निच विकृतपणाच म्हणावा लागेल. हे नराधम आहेत जे आपल्याच मातेवर बलात्कार करु पाहणारे त्यांना दुसरे नावच नाही.

अनेक ठिकाणी मा. परिवहनमंत्री अनिल परब साहेब यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत हजारो कर्मचारी जवळपास महीना भरापासून सूरु असलेल्या संपातून माघार घेत कामावर रुजू होत आहेत, प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज होत आहेत. तर त्यांना रोखण्यासाठी संपकरी जर लालपरीवरच दगड मारणार असतील तर सरकारने या संपकरी कर्मचा-यांच्या प्रत्येक डेपोतील म्होरक्यांना थेट स्थानबद्ध केले पाहिजे.

जनतेच्या सहनशीलतेचा अंत संपक-यांनी पाहू नये. अनेक ठिकाणी एसटी बसेस फोडल्याच्या बातम्या येत आहेत, आज कल्याण आगाराची बस कल्याण भिवंडी या मार्गावर प्रवाशांसह धावत असताना त्याच डेपोतील एका चालकाने पुढची व मागची काच दगड मारुन फोडली, सुदैवाने कोणा प्रवाशांना‌ ईजा झाली नाही पण मालमत्तेचे नुकसान झाले. त्या विकृत चालकावर व त्याच्या सहका-यांना कडक शासन झाले पाहिजे. आज त्याच्या एकट्यावर गुन्हा नोंद होवून भागणार नाही , त्याचे सहकारी व त्या मागचा विकृत मेंदू कोणाचा हे सुध्दा शोधून पोलिसांनी कारवाई करायला हवी.

संपक-या कर्मचाऱ्यांना आम्ही एसटी प्रेमी कर्मचारी व अधिकारी या द्वारे इशारा देत आहोत, "याद राखा , लाल परीला साधा ओरखडा जरी काढाल तर ....." विचारांचा लढा, विचारांनी लढा, अविचाराने स्वत: बरोबर इतरांचा विध्वंस करु नका. या महाराष्ट्राला थोर विचारांची परंपरा आहे. त्या महाराष्ट्रात प्रवाशी जनता जी एसटी वर जीवापाड प्रेम करते ती जनता असला अधमपणा सहन करणार नाही. जनता डोक्यावर घेते सुध्दा, अन् तीच जनता डोक्यावरुन आपटते सुध्दा. तूर्तास इतकेच.
विजय गायकवाड, आगार व्यवस्थापक, कल्याण आगार.

विजय गायकवाड :- 99226 39950

42 comments:

  1. न्याय हक्कासाठी लढणे चुकीचे नाही पण हिंसा करणे सर्वार्थाने चुकीचे आहे, एस्टीवर हल्ला करू नये

    ReplyDelete
  2. साहेब आपल्याकडे proof असेल तर त्या लोकावर गुन्हा दाखल करा पण आपण कसे म्हणू शकता हे काम एस टी कर्माच्यार्यानेच केले असेल

    ReplyDelete
  3. साहेब आपण बोलताना आई या शब्दाचा तरी विचार करा, तुम्ही जेथून जन्म घेतला तीच महत्व तुम्ही विसरलात, तुम्हाला आईच का शब्द दिसला, हो, अश्या विचारसरणीचा धिक्कार आहे

    ReplyDelete
  4. साहेब आपल्याकडे पुरावा असेल तर हे कृत्य करणार्या लोकांवर
    गुन्हा दाखल झालाच पाहिजे पण आपण म्हणता की आपल्याच कामगाराने बसला दगड मारले आहेत तर हे आपल्या बयान चुकीचे आहे कारण कोणताच कामगार आपल्या मायमाऊलीला
    दगड मारणार नाही

    ReplyDelete
  5. अतिशय घाणेरडी आणि विकृत बुद्धीच प्रदर्शन केलय अस बोलून या आगार व्यवस्थापकांनी, आपल्याकडे काय पुरावा आहे ही बस st कर्मचाऱ्यांनी फोडल्याचा, खाल्ल्या मिठाला कर्मचारीच जगतात महाराज, कर्मचाऱ्यांवर चिखलफेक ,आरोप करतांना 100 दा विचार करावा,,

    ReplyDelete
  6. तुम्ही लोक वेगवेगळ्या मार्गातून(डीझेल, LP,डिफॉल्ट केसेस) रोज त्याच माय माऊलीवर बलात्कार करता म्हणूनच आज ही वेळ आली आहे

    ज्या बिचाऱ्या कामगारांनी एस.टी.टिकवली,ज्यांच्या कष्टाच्या जीवावर तुम्ही जगता त्यांच्यावर असले आरोप करताना लाज वाटत नाही का?

    सर्वसामान्य कर्मचाऱ्याच्या मनातही असले विचार येणार नाहीत

    असल्या घाणेरड्या मनोवृत्तीचा जाहीर निषेध.

    ReplyDelete
  7. यांच्याकडे पुरावा नसताना हे असे बोलतात म्हणजे किती घाणेरडे बुद्धी असेल याची

    ReplyDelete
  8. आपल्याकडे पुरावा आहे हे कृत्य S T कामगाराने केले आहे??? कोणताच कामगार असे करू शकत नाहीं... पुरावा असेल तर गुन्हा दाखल करा. आणि लेख छान आहे पण आई या शब्दाचा वापर कोणत्या मुळाला धरून केला आहे.... आगार व्यवस्थापक म्हणून गुन्हा नोंद करणे हा आपला अधिकार आहे..... तो जरूर करावा...

    ReplyDelete
  9. साहेब....हे. संस्कार माझ्या एसटी कर्मचारी मध्ये नाहीत. फुकट मिळालेल्या पैशाचा माज.. करणारे लोकं असं कृत्य करू शकतात.... आणि हो.. तुमची जी भाषा आहे यावरून तुमचे संस्कार देखील कळतात... कशे असतील ते...🙏

    ReplyDelete
  10. आज पर्यंत आपल्या आगारात ज्या थोर पुरुषांच्या जयंती पुण्यतिथी साजरी करता १५ ऑगस्ट २६ जानेवारी साजरा करता त्यासाठी महामंडळाचा पैसे येतो त्या पैशातुन चहा पाणी कर्मचाऱ्यासाठी सोडाच एक हार तरी घेतला का यांनी ते पण कामगारांनी वर्गणी करून घेतले . मग ते पैसे त्याच आईचे होते ना?

    ReplyDelete
  11. एसटी वर हल्ला हा बहुतेक वडाप वाले ,खाजगी वाहतूक वाले करतात बंद काळात, संप काळात

    ReplyDelete
  12. साहेब तुमच्याकडे कर्मचारी विरुद्ध काचा फोडल्याचा पाठपुरावा असेल तर रितसर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा पन कोनाच्या आई बहीण काढायचा तुम्हाला काही अधीकार नाही

    ReplyDelete
  13. असे बोलणे मूर्खपणा आहे

    ReplyDelete
  14. ए रताळ्या तुला काही कळते का

    ReplyDelete
  15. अधिकारी फक्त एसटी ला कसे खाता येईल हा विचार करता बाकी काही नाही.

    ReplyDelete
  16. तुझ्याजवळ पुरावा आहे का काही कामगारांनी बस फोडल्याचा अस कुणाची पण आईबहिन काढायचा तुला कुणी अधिकार दिला बस कुणी फोडली याचा तपास पोलीस लावतील ST कामगार कधीही बसवर दगड मारणार नाही आणि माहीत असेल कुणाचं नाव दगडफेक करणाराच तर तक्रार कर ना उगाच तोंड दिलंय म्हणून काहि बोलू नको नाहीतर तुझं थोबाड फोडून काढेल हा समाज

    ReplyDelete
  17. असला डेपो मॅनेजर मूर्ख पनाचा बाजार आहे पैसे देऊन लागला वाटते काय बोलावं हेच समजत नाही यांना

    ReplyDelete
  18. आपण एक जबाबदार अधिकारी आहेत, आगार व्यवस्थापक,यासाठी तुम्ही मास्टर ऑफ बिसनेस मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले असेल, तुम्ही कोणी पोलीस खात्यात काम करणारे किंवा गुन्हा अन्वेषण विभागात काम करत नाही, तुम्ही सरळ म्हणता दगड मारणारा चालक होत,आणि तोही तुमच्या डेपोमधील मग तुम्ही त्याला प्रत्यक्षात पहिला असेल की, मग त्या वेळी त्याच्या मुस्कडत का नाही मारली, तुम्ही गाडीची काच फुटायची वाट बघत होता का? आणि जर तुम्ही त्याला प्रत्यक्षात पहिला नाही तर मग तो चालक होता हे इतक्या आत्मविश्वासाने कसे सांगता? साहेब तुम्ही दिलेला तुमचा अभिप्राय, प्रतिक्रिया छान होती, पण" आई" हा जो शब्द तुम्ही वापरला तो तुमच्या अविकसित बुद्धीचा भाग आहे हे सिद्ध करतो, तुम्ही तर राजकीय पुढारीपेक्षा खालच्या पातळीचे आहेत, त्या पुढाऱ्यांना तसे शब्द वापरता तरी येतात पण तुम्हाला शब्द नाहीत.

    ReplyDelete
  19. साहेब कर्मचाऱ्यांनी फोडली हे सिद्ध होते का

    ReplyDelete
  20. साहेब हा आरोप योग्य आहे का, असेल तर कारवाई करा.
    आपल्या मायमाऊलीवर खाजगी वाले हल्ला करत असतील याची तुम्हाला जान आहे का? पण आपल्या कामगारात अशी निचता नाही. पण तुमची ही भाषा योग्य आहे असे वाटते का? तुम्हाला पण आई आहेच पण असे शब्द योग्य आहेत का? यावरून आपले संस्कार कसे हे समजले आईबद्दल चे.
    धन्यवाद साहेब

    ReplyDelete
  21. साहेब तुम्ही पुरावे असेल तर बोला ज्यांनी चूक केली त्यांना सजा द्या परंतु अशी घाणेरडी भाषा वापरू नका त्यावरून कामगार यांचे पेक्षा तुमची काय संस्कृती आहे हे समस्त कामगारांना कळले आहे दुसरे अशेकी तुम्हाला पगार भरपूर आहे काय की तुमच्या पप्पांच्या मालकीची बस आहे काय तुम्ही पगार वाढ घेणार नाही आहेत महामंडळाच्या ् ्चा/वा यांचेवर तुम्ही कधी खोटी कारवाई केली नाही हे तुमच्या मुलाच्या डोक्यावर हात ठेऊन शपत घेऊन सांगू शकता का मग त्या कर्मचाऱ्याची काय अवस्था होत असेल असा कधी विचार केला काय हो त्या वेळेस तुमच्या.बद्दल तुम्ही जे शब्द वापरले तुमच्या बाबतीत तंतोतंत लागू होतात तेव्हा जरा विचार करून बोलत जाणे कारण कोणावर कशी वेळ येईल हे सांगता येत नाही जेव्हा प्रशासनाने व मान्य तेने कामगारांचे प्रत्येक पगार मध्ये जी तफावत झाली त्याबद्दल काही विचार केला का कामगार का चिडले हा विचार करा आणि याद राखा जे कष्ट करी बांधव यांचे करिता बिन पुराव्याचे बोलत जाऊ नये

    ReplyDelete
  22. आगार व्यवस्थापक म्हणजे मोठी पदवी नाही कुत्र ओळखत नाही दुसर्या खात्यात.आणि लायकी पण नाही एसटी मधील अधिकारी व कर्मचारी यांना खुप हलकट समजतात बाकीचे खाते.म्हणून जरा सांबाळून बोलावे.

    ReplyDelete
  23. आगार व्यवस्थापक साहेबांना थोडी लाज वाटायला हवी कारण एसटी कामगार कधीच आपल्या आईवर हात उगारणार नाही तसं बघायला गेलं तर हेच अधीकार एसटीचे विध्वंसक आहेत.किंवा हेच खरे बलत्कारीत आहेत असं म्हणायला हरकत नाही.

    ReplyDelete
  24. Nalayak manus aahe ha depo maneger

    ReplyDelete
  25. चुकीची विचार सारणी आहे तुमची साहेब. हा कष्टकरी आहे तो असा करणारच नाही. तो लालपरीला भ्रष्टाचारापासुन वाचवतोय व स्वत: च्या कुटुंबाच्या पोटासाठी लढतोय. लालपरी विलिनिकरण झाल्यावरच ती टिकणार आहे व चिरंतन काल जनतेची सेवा करणार आहे.

    ReplyDelete
  26. हा नीच बुद्धीचा माणूस आहे कारण की एवढ्या मोठ्या पदावरचा माणूस असे बोलूच शकत नाही पुरावा असल्याशिवाय तो आई बहिणीवर बोलत आहे त्यामुळे त्याची बुद्धिमत्ता समजून येत आहे तू किती नीच आहे तो

    ReplyDelete
  27. अतिशय घाणेरेडा, विक्षिप्त व नालायक , बिनडोक माणुस त्याच्या विचारसरणीवरुन
    वाटतोय..

    ReplyDelete
  28. या आगार व्यवस्थापकाच्या रक्तात आहे वाटते स्वतःच्या आई वर बलात्कार करणे...म्हणून तर हा नीच अशी भाषा वापरतोय...हरामखोर

    ReplyDelete
  29. आगार व्यवस्थापक यांना आपल्या आईची म्हणजे लाल परी हिची दुरुस्ती करताना, पावसात भिजताना, निकृष्ट spare पार्ट जोडत असता, गाडीची चालक आसन बसता येत नाही, अशा वेळी लाल परी ची जन्मानसात अब्रू जात असते, त्यावेळी हे महाभाग गप्प असतात.. यांच्या कल्याण डेपो त बगा की रात्री च्या या च लाल परी बस मंध्ये जो काही रातीस खेळ चले त्यावेळी हे महभाग शांत असतात तेथे रोज अब्रू वेशी वर टांगली जाते... तेव्हा सुखाने घरी झोपा काढत असतात..... तेव्हा आज कोणी लाल परी दगड मारला तर अकेलेचे तारे तोडतात....... आणि समाजात अशी विधाने करून आपल्या असलेल्या बुद्धी ची जाणीव करून देतात की स्वतः प्रसिद्धी झोतात येण्याची हाव सुटलेली आहे.... म्हणतात ना विनाश काले विपरीत बुद्धी....

    ReplyDelete
  30. साहेबांनी मालेगाव हिंसाचार दिवसाची बातमी बघावी आंदोलन कर्ते कर्मचारी दगडफेक होत असताना बस स्थानकात फलाटाला असलेल्या बस आंदोलन सोडून त्या डेपोच्या आत मध्ये लावल्या

    ReplyDelete
  31. मा. गायकवाड साहेब, आगार प्रमुख कल्याण, तुम्ही एक एसटी कर्मचारी आहात. तुम्हाला जर म्हटले की उचला दगड आणि मारा बसवर तर माराल? अहो ही लालपरीच कर्मचाऱ्यांची माय माऊली आहे. मला माहिती आहे की एसटी बसेस वर दगडफेक झाली
    लक्षात घ्या यामध्ये सरकार एसटी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरणार पण एसटी कर्मचाऱ्यांच्या संपा अडून खाजगी वाले हे काम करत आहेत कारण त्यांचा धंदा सध्या जोरात चालू आहे
    कारण कोणत्याही परिस्थितीत एसटी कर्मचारी लालपरीवर दगड उचलणार नाही

    ReplyDelete
  32. साहेब तुम्ही चुकीच्या पद्धतीने बोलत आहेत एस टी कर्मचारयाची अशी विकृती नाही

    ReplyDelete
  33. हे षड़यंत्र पन असु शकते?

    ReplyDelete
  34. ही बलात्कारामधूनच जन्मलेल दिसत आहे

    ReplyDelete
  35. संप करणार्‍या कर्मचाऱ्यांनी दगडफेक केली हे सिद्ध झालं आहे का ? विनाकारण असे आरोप लावणे चुकीचे आहे .तुम्ही अधिकारी आहात याचा अर्थ कर्मचारी वर वाट्टेल ते आरोप लावू शकत नाही

    ReplyDelete
  36. पहीले तर आपले विधान हे खुप बालिश पणाचे वाटतेय,आणि आपल्या कर्मचार्‍यांप्रतीचा आकस आपल्या वाक्यातुन स्पष्ट दिसत आहे.आपल्याकडे पुरावा असेलतर बिनधास्त सादर करुन सदर व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल करावा,पण आपल्यालाच किती एस.टी.चा पुळका आहे याचा हा केविलवाना प्रयत्न दिसतोय...

    ReplyDelete
  37. आपण केलेलें विधान फारच चुकीचे असुन आपण किती निच दर्जाचा विचार करता व समाजातील महीलांप्रती तुमचे किती घाणेरडे विचार आसतील हे यातुन दीसुन येते.
    तुम्ही एका जबाबदार पदावर असुन आगारातील सर्व कामगारांचे
    पालकत्व आपल्याकडेच आहे. पणं जी भाषा तुम्हीं वापरली त्यावरुन अंदाज लागतो की तुमची कामगारांप्रती वागणुक कशी
    आसेल.नक़्कीच तुम्हीं त्यांची पिळवणूक करीत असणार.

    ReplyDelete
  38. अशा प्रकारचा लांच्छनास्पद आरोप करण्यासाठी आपण स्वतःला कितीला विकलं हे पण जाहीर करा...लाज वाटायला पाहिजे आपल्याला

    ReplyDelete
  39. He lehyayla kete paise getale....?

    ReplyDelete
  40. Abe saalya vijaya jyaa pramane Tu aaplya aaie cha Ya aaplya porecha blathkaar kru shakth nahi teach St cha kamgar lalpari war dagad maru shakth nahi he Samjun ghe pagla he me tula Danke ke chot war sangath aahe

    ReplyDelete

महाआघाडीतील विसंवाद यामुळे कल्याण लोकसभा मतदारसंघात श्रीकांत शिंदे यांचा विजय होणार मोठ्या मताधिक्याने !! कल्याण लोकसभा मतदारसंघात अंबरनाथ, ...