महापुरुषांच्या आयुष्यभर कष्टाचे फळ म्हणून आपण चांगले दिवस अनुभव तो आहे-जयश्री सासे,!
कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्राच्या मातीत जन्म घेतलेल्या नररत्ने, महापुरुष, समाजसेवक, समाजसुधारक, आदीनी त्यांच्या उभ्या आयुष्यात अनेक हाल अपेष्टा, दु:ख सोसले त्यांनी केलेल्या महान त्यागामुळेच आज आपण सर्व जण चांगले, सोन्याचे दिवस अनुभवत आहे, असे गौरवोद्गार कल्याण तालुक्यातील ठाणे जिल्हा परिषदेच्या सदस्यां श्रीमती जयश्रीताई सासे यांनी काढले, त्या महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद ठाणे, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प कल्याण आयोजित पंचायत राज संस्था मधील महिला लोकप्रतिनिधी प्रशिक्षण व महिला मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होत्या.
कल्याण तालुक्यातील म्हसरोंडी या आदिवासी गावात महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
आपल्या भाषणात त्या पुढे म्हणाल्या, महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न, घटनेचे शिल्पकार, डॉ बाबासाहेब आंबेडकर, पहिल्या स्त्री शिक्षिका, क्रांती ज्योती सावित्रीबाई, फुले, महात्मा जोतिबा फुले, राजश्री छत्रपती शाहू महाराज आदी महापुरुष, समाजसुधारक, यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, अंत्यत कठीण संकटाला सामोरे जाऊन दु:ख सोसले,प्रंसगी आपले जीवन त्यागले ,आणि त्यामुळे च आज आपल्याला हे चांगले दिवस अनुभवायला मिळत आहे, आपण ते विसरता कामा नये, असे सांगून प्रत्येक महिलांनी सावित्रीबाई फुले यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काम करायला हवे,आपण ज्या क्षेत्रात काम करतो, ते प्रामाणिकपणे केले तर समाजही सुखी होईल,आणि असे झाले तरच या महिला मेळाव्याला अर्थ प्राप्त होईल, असे त्यांनी सांगितले.
यावेळी व्यासपीठावर विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते, तसेच कल्याण पंचायत समितीच्या एकात्मिक बालविकास विभागाच्या मुख्य सेविका, विस्तार अधिकारी, आरोग्य विभागाचे कर्मचारी, शिक्षक,शालेय विद्यार्थी, म्हसरोंडी गावातील महिला, तसेच पत्रकार संजय कांबळे आदी मंडळी उपस्थित होते.




No comments:
Post a Comment