Friday, 24 December 2021

महात्मा फुले चौक पोलीसांनी शिताफीने अटक करून ०४ गुन्हे उघडकीस आणले.!!

महात्मा फुले चौक पोलीसांनी शिताफीने अटक करून ०४ गुन्हे उघडकीस आणले.!!

"आधारवाडी कारागृह, कल्याण मधुन पलायन करणा-या तसेच जबरी चोरी करणा-या गुन्हेगारास अटक"


महाराष्ट्र प्रतिनिधी, हेमंत रोकडे : कल्याण आधारवाडी जेल मधून पळून गेलेल्या आरोपीला महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलिसांनी अटक केली असून हा आरोपी पुन्हा चोरी करतानाच महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलिसांना आढळून आला आहे. विशेष म्हणजे या आरोपीवर पंढरपूर, पैठण तसेच परळी वैजनाथ येथे देखील गुन्हे दाखल असून हा आरोपी यापूर्वी पंढरपूर कारागृहातून देखील पळून गेला होता. 


यावेळी त्याच्याकडून 45 हजार 500 रुपयांचा माल जप्त केला आहे. भिवंडी येथे राहणारा अविनाश कैलाश गायकवाड (26) याने हात गाडीवर फळे खरेदी करणाऱ्या एका ग्राहकांच्या खिशातून विवो वाय - ९१ या मोबाइलची चोरी केली. त्यानंतर कल्याण येथील बस स्टँड परिसरात येणार असल्याची माहिती  पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या इसमाला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. अटक केल्यानंतर त्याला विश्वासात घेऊन त्याच्याकडून 5 मोबाइल जप्त केले. तसेच आधीच्या गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवणारा हा इसम आधारवाडी जेल मधुन हा पळून गेला असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या इसमावर पैठण परळी वैजनाथ आणि पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हे दाखल असून पंढरपूर कारागृहातून देखील हा इसम पळून गेल्याची माहिती महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन पोलिसांनी दिली. 


अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे  पुर्व प्रादेशिक विभाग, कल्याण सचिन गुंजाळ सो. पोलीस उप आयुक्त परिमंडळ ३, कल्याण, उमेश माने पाटील. सपोलीस युक्त कल्याण, अशोक होनमाने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन, ब्लीस निरीक्षक (गुन्हे) श्री. प्रदीप पाटील, म.फु. चौक पो.स्टे.  यांच्या मार्गदर्शनाखाली  सहा पोलीस निरीक्षक देविदास ढोले,  पोलीस निरीक्षक सागर चव्हाण, पोलिस हवालदार निकाळे चित्ते, भोईर, भालेराव, तडवी, सोनवणे, कांगरे, मधाळे यांनी केली आहे. सदर गुन्हयाचा तपास सहा पोलीस निरीक्षक देविदास ढोले महात्मा फुले क पोलीस ठाणे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !!

तळघर ग्रामस्थ मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने श्री लक्ष्मी नारायण मंदिर जीर्णोद्धार व प्राणप्रतिष्ठा तसेच पालखी सोहळ्याचे आयोजन !! ...