Wednesday, 22 December 2021

मुंबईचे उपमहापौर अँड .सुहास वाडकर यांचा वाढदिवस ज्येष्ठां सोबत संपन्न !!

मुंबईचे उपमहापौर अँड .सुहास वाडकर यांचा वाढदिवस ज्येष्ठां सोबत संपन्न !!
 
मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         मुंबईचे उपमहापौर- प्रभाग क्र. ४०चे नगरसेवक अँड .सुहास वाडकर यांचा वाढदिवस, गोरेगाव पूर्व येथील नागरी निवारा सांकृतिक केंद्र, संकल्प सहनिवास येथे संकल्प सहनिवास ज्येष्ठ नागरिक संघ (मुंबई) यांच्या सभासदांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात नुकताच संपन्न झाला. 


संघाच्या ज्येष्ठ महिला- वृषाली विचारे, अपर्णा धारकर, अरुणा रसे, मंगला गायकवाड व ज्योती मारुलकर यांनी उपमहापौर अँड. सुहास वाडकर यांना औक्षण करून वाढदिवसा निमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. शिवसेना शाखा क्र. ४० चे शाखा प्रमुख संदीप जाधव, उपशाखा प्रमुख अरुण साटम व विकास पालांडे, शाखा संघटक -पद्मा राऊळ व ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष- दिलीप धारकर, सचिव-सूर्यकांत सोडये व्यासपीठावर उपस्थित होते. ज्येष्ठ नागरिक संधाचे वसंत मालगुंडकर, शांताराम खामकर, काशिराम चव्हाण, रामकृष्ण फोडनाईक, विद्यानंद विचारे सह सर्व सभासद  मोठया संख्येने उपमहापौर यांना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...