अबोली रिक्षाचालकांची राखीव स्टॅन्ड देण्याची मागणी !!
"अबोली रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत व कल्याण शहर महिला अध्यक्षा शारदा ओहळ यांनी सहकाऱ्यांसह केली मागणी"
कल्याण, ऋषिकेश चौधरी : महिला सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने महिलांना 2017 मध्ये अबोली रिक्षा परवाना देण्यास सुरुवात केली, त्यानुसार कल्याण डोंबिवली शहरात आज मितीस सुमारे 30 ते 35 अबोली रिक्षा आहेत, मात्र महिला रिक्षा चालकांना स्वतःचा रिक्षा स्टँड मिळाला नाही.
अबोली रिक्षा सुरुवात करतांना मोठा गाजावाजा केला होता, कल्याण डोंबिवली शहरात शेकडो अबोली रिक्षा फिरताना दिसतील व महिलांना सुरक्षित प्रवास करता येईल अश्या वल्गना शासकीय पातळीवर व लोकप्रतिनिधी यांनी केल्या होत्या, मात्र शासन व अधिकारी यांनी अबोली रिक्षा चालकांना प्रोत्साहन दिले नसल्याने अबोली रिक्षाची संख्या वाढली नाही.
प्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक पोलीस व कल्याण डोंबिवली महापालिकेने कल्याण डोंबिबली शहरात पूर्व व पश्चिम विभागात अबोली रिक्षा चालकांनी कायमस्वरूपी रिक्षा स्थानक मिळण्यासाठी प्रशासन कडे मागणी केली आहे.
कल्याण डोंबिवलीत अबोली रिक्षा व्यवसाय करताना महिला रिक्षा चालकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, सायंकाळी रेल्वे स्टेशन परिसरात प्रवाशी घेण्यासाठी रांगेत उभे राहिल्यास एक ते दीड तास वाट पहात, रांगेतील रिक्षा धकलावी लागते, त्यामुळे थकवा येतो, त्याच प्रमाणे वेळ जास्त लागत असल्यामुळे धंदा हवा तसा होत नाही, घराची सर्व कामे करून रिक्षा चालवावी लागत असल्यामुळे धंदा कमी झाल्यास परवड नाही, यामुळे अबोली चालविण्यासाठी महिला पुढे येत नाहीत, यामुळे अबोली रिक्षा चालकांसाठी स्टँड राखीव ठेवल्यास महिला प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येईल यासाठी स्टँड आरक्षित ठेवावा अशी मागणी अबोली रिक्षा चालक संघटनेचे अध्यक्ष संतोष भगत व कल्याण शहर महिला अध्यक्षा शारदा ओहळ यांनी पालिका प्रशासन, आरटीओ व वाहतूक पोलिसांकडे केली आहे.



No comments:
Post a Comment