Monday 20 December 2021

वडिलांसोबत मुलाला बेदम मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी येथील सावाद गावात घडला आहे.!! "शुल्लक कारणावरून झालेल्या वादात परस्पर गुन्हे दाखल"

वडिलांसोबत मुलाला बेदम मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हे दाखल झाल्याचा धक्कादायक प्रकार भिवंडी येथील सावाद गावात घडला आहे.!!

"शुल्लक कारणावरून झालेल्या वादात परस्पर गुन्हे दाखल" 


भिवंडी, ऋषिकेश चौधरी :
          शुल्लक कारणावरून वडिलांसह मुलाला बेदम मारहाण करणाऱ्या चुलत्यांनी मारहाण केलेल्यावरच गुन्हा दाखल केल्याचा धक्कादायक प्रकार पडघा पोलीस स्टेशन हद्दीत सावाद गावात घडला आहे. त्यामुळे दोन्ही चुलत्याविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेचे सविस्तर तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून सावद गावात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होतांना दिसत आहे.


           भिवंडी तालुक्यातील सावाद गावात शांताराम म्हात्रे हे आपल्या परिवारासोबत गेल्या अनेक वर्षांपासून  वास्तव्य करत आहेत. शांताराम म्हात्रे यांच्यावर नुकतीच भारतीय काँग्रेस पक्षाची परिवहन विभागाचे ठाणे ग्रामीण जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी वरिष्ठांकडून सोपवण्यात आली आहे. पक्ष बांधणीसाठी शांताराम म्हात्रे यांनी समाजकारणाचा वसा हाथी घेऊन भिवंडी परिसरातील विविध समस्यां सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. 


यासाठी पक्षाचे कार्यालय असावे म्हणून स्वतःच्या मालकी जागेवर एका कार्यालयाचे बांधकाम काही दिवसापासून सुरू केले होते. पक्ष कार्यालयाचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात असतांना शेजारी राहणाऱ्या चुलत्यांकडून शुल्लक कारण पुढे करत शांताराम म्हात्रेसह त्याचा   मुलगा आदित्य यास बेधम मारहाण केले. मारहाणीत शांताराम म्हात्रे आणि मुलगा आदित्य यास डोक्यात, खांद्यावर आणि हातापायावर गंभीर दुखापत झाली असून चुलत्यांविरोधात न्याय मागण्यासाठी शांताराम म्हात्रे यांनी पडघा पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. 


चुलत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी गेलेल्या शांताराम म्हात्रे यांना पोलीस स्टेशन मधून योग्य ते सहकार्य मिळत नसल्यामुळे म्हात्रे यांनी उपचारासाठी कल्याण येथील रुक्मिणीबाई रुग्णालयात धाव घेतली. या दरम्यान चुलत्यांकडून शांताराम म्हात्रे यांनी आपल्या परिवाराला मारहाण केल्याचे पोलिसात गुन्हा दाखल केला. या वरून मारहाण झालेल्या शांताराम म्हात्रे यांच्यावरही गुन्हा दाखल झाल्याने शांताराम म्हात्रे यांना मारहाण करून त्यांच्यावरच गुन्हा दाखल होत असेल तर पीडितांनी कोणाकडे न्याय मागायचा? हा मोठा प्रश्न शांताराम म्हात्रे यांच्या समोर आव धरून उभा आहे. या मारहाणीत शांताराम म्हात्रे यांची इनोव्हा कारच्या काचा देखील फोडण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले. त्यामुळे जो पर्यंत न्याय मिळत नाही तो पर्यंत आमरण उपोषणाचा हत्यार उचलणार असल्याचे शांताराम म्हात्रे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

No comments:

Post a Comment

ओम हॉस्पिटल च्या सुसज्य नवीन वास्तूचा शानदार उद् घाटन सोहळा उत्साहात संपन्न !!

ओम हॉस्पिटल च्या सुसज्य नवीन वास्तूचा शानदार उद् घाटन सोहळा उत्साहात संपन्न !! पाचोरा, प्रतिनिधी : पाचोरा शहरांमध्ये रुग्णांना अ...