Monday 20 December 2021

"कल्याण ट्रॉफी" मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता !! "जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा"

"कल्याण ट्रॉफी" मिरारोड विजेता तर कल्याण उपविजेता !!

"जिल्हास्तरीय स्केटींग स्पर्धा"


कल्याण, बातमीदार :- स्केटिंग असो. ऑफ़ महाराष्ट्र च्या मान्यतेने रीजन्सी अंटालिया ग्रुप व स्केटिंग असो.ऑफ कल्याण तालुका यांच्या संयुक्त शहाड येते 4 थी कल्याण ट्रॉफी जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 


या स्पर्धेत मीरारोड स्केट लाईफ स्केटर्स क्लबने 70 गुणासह स्पर्धेचे अंतिम विजेतेपद पटकावले तर कल्याणच्या सागर स्केटर्स क्लबने 52  गुणासह स्पर्धेचे उपविजेते पदाचा मान मिळवला.  कल्याणच्याच पवन क्लबला 40 गुणासह तृतीय स्थानावर समाधान मानावे लागले. सर्व विजेत्या संघाला 'कल्याण ट्रॉफी' चषक व रोख रक्कम अनुक्रमे 3001/- 2001/- व 1001/- देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेत मुंबई विभागच्या 190 खेळाडूनी सहभाग घेऊन स्पर्धेला चांगला प्रतिसाद दिला. 


स्पर्धा स्केटिंगच्या पाच विविध प्रकारात खेळवण्यात आली स्पर्धचे उद्घाटन रीजन्सी ग्रुपचे डायरेक्टर विकी रूपचंदानी, राम तलरेजा आणि अनिल भाटीजा यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी पप्पू सैनी, साहिल भातिजा हे उपस्थित होते. स्पर्धेला पालकांनी मोठा प्रतिसाद दिला. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गीतेश वैद्य, विनोद पाल, संदीप यादव राज सिंग, संतोष मिश्रा, सागर कुलदीप, गुफ्रान शेख, संदीप माने, पवन ठाकूर, सुरेंद्र आव्हाड, आयप्पा नायडू, दुर्वा वैद्य, सुरभी गुंगरू, मोहित बजाज, यांनी परिश्रम घेतले.


स्पर्धेतील काही सुवर्ण विजेते :- 

आध्या कामत ; अयान नेत्रा ; प्रयाग पटेल ; अदिना शाह ; अवणीस वागळे ; अर्जित जोयाशी ; अंश साळुंखे ; देवयानी थोरबोले ; रुद्रांशा प्रतिहार ; तुष्य चुडासमा ; अर्णव थोरात ; मृणाल साबळे ; सामृदी सातारकर ; नशराह कुडाळकर ; देव विश्वकर्मा ; शौविक सामंत ; अरमान सय्यद ; जपज्योत कौर ; समर्थ पाई ; रोहित नाईक ; रीना मोरे ; उत्कर्शा गद्दक.

No comments:

Post a Comment

जातीय सलोख्यासाठी भाकप ला मतदान करा.. काम्रेड देसले

जातीय सलोख्यासाठी भाकप ला मतदान करा.. काम्रेड देसले   परभणी, प्रतिनिधी.. भारतीय कम्युनिस्ट पक्ष देशात ज्या ज्या वेळी कष्टकरी अल्...