Tuesday 21 December 2021

अखेर लोकसभेत मंजूर झाले मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणारे विधेयक.त्यामुळे रोखले जाणार बोगस मतदान.!!

अखेर लोकसभेत मंजूर झाले मतदान कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणारे विधेयक.त्यामुळे रोखले जाणार बोगस मतदान.!!


भिवंडी, दिं,21, अरुण पाटील (कोपर) : 

आता आधार कार्डसोबत आपले मतदान कार्ड लिंक केले जाणार असून लोकसभेत त्या संदर्भातील विधेयक मंजूर करण्यात आले आहे. केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी लोकसभेत निवडणूक सुधारणा विधेयक 2021 सादर केले. या विधेयकाच्या माध्यमातून लोकप्रतिनिधी कायदा, 1950 आणि लोकप्रतिनिधी कायदा, 1951 मध्ये बदल करण्यात येणार आहेत. निवडणूक सुधारणांच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. केंद्रीय मंत्रि मंडळाने गेल्या आठवड्यात बुधवारी या बदलांना मंजुरी दिली होती. 

सध्या ही बाब ऐच्छिक किंवा पर्यायी असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच, लोकांना त्यांचे मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याचा पर्याय देण्यात येईल. त्यामुळे मतदाराची एक स्वतंत्र ओळख निर्माण होणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आता लोकसभेचे कामकाज 21 डिसेंबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. सर्वात मोठा बदल मतदार ओळखपत्राबाबत करण्यात येत आहे. 

मतदार यादीतील बोगस मतदान रोखण्यासाठी मतदार कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यात येणार असल्याचे या विधेयकाच्या मसुद्यात सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर मतदार यादीही आधारशी लिंक करण्याचा प्रस्ताव आहे. निवडणूक सुधारणा संबंधीच्या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तीन मोठे बदल केंद्र सरकारने केले आहेत. मतदार ओळखपत्र आणि आधार क्रमांक लिंक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. तूर्तास आधार क्रमांक लिंक करणे ही बाब ऐच्छिक असणार आहे. त्यासोबत नवीन मतदार म्हणून नाव नोंदणी करण्यासाठी नवमतदारांना एका वर्षात चार वेळेस संधी देण्यात यावी.

No comments:

Post a Comment

**"घरपण नाही घराला" दोन अंकी नाट्यकृतीचा आज पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग !

**"घरपण नाही घराला" दोन अंकी नाट्यकृतीचा आज पार्ल्याच्या मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात शुभारंभ प्रयोग ! मुंबई - ( दिप...