Tuesday, 21 December 2021

शहापूरच्या "वजीर" वरून पहिले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत ह्यांना श्रद्धांजली !!

शहापूरच्या "वजीर" वरून पहिले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत ह्यांना श्रद्धांजली !!


महाराष्ट्र प्रतिनिधी, हेमंत रोकडे: काही दिवसांपूर्वीच भारताचे पहिले तिन्ही दलाचे प्रमुख बिपिन रावत हे हेलिकॉप्टर अपघातात शहिद झाले. ह्या अपघाताने संपूर्ण देश हळहळला. कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरने महाराष्ट्रातील सर्वात कठीण सुळखा असलेल्या वजीर वरून महाराष्ट्राच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. वजीर हा सुळखा शहापूर तालुक्यातील वशिंद गावात आहे. सुमारे २८० फूट उंचावर असलेला हा सुळखा ९० अंश कोनात उभा राहिलेला आहे. ह्या मोहिमेत सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांच्या वतीने भूषण पवार, पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, प्रदीप घरत, नितेश पाटील, अभिषेक गोरे, सुनील कणसे हे उपस्थित होते. त्याच सोबत मोहिमेत विशेष आकर्षण होते ते वयाची ५० पार केलेले गिर्यारोहकांनी सुद्धा सहभागी होऊन देशाच्या पहिल्या तिन्ही दल प्रमुख ह्यांना श्रद्धांजली वाहिले ज्यात सुशील राऊत, प्रफुल वाळुंज, सचिन राणे आणि संतोष आंबरे हे उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...