शिवसेनेचा धडक मोर्चा अदाणी समूहावर !!
कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण येथीलमोहने गेट येथे शिवसेनेच्या माध्यमातून शुक्रवारी मोर्चा काढून आगामी काळात अदाणी समूहात एनआरसी कामगार, भूमिपुत्र, स्थानिक कुशल आणि शैक्षणिक पात्रता असणाऱ्या बेरोजगार मुला-मुलींना नोकऱ्या मिळाव्यात तसेच एनआरसी शाळेतील विद्यार्थीची फी माफीसंदर्भात अदाणी व्यवस्थापनाला निवेदन दिले.
शिवसेनेच्या माध्यमातून काढलेल्या मागणी मोर्चाचे नेतृत्व शिवसेना उपविभागप्रमुख अंकुश जोगदंड यांनी केले. शिवसेनेचे माजी नगरसेवक मयूर पाटील, दयाशंकर शेट्टी, विजय काटकर, शिवसेनेचे पदाधिकारी, शिवाजी गोंधळे, राम तरे, अनिल गोवळकर, रोहन कोट आदी उपस्थित होते. अदाणी व्यवस्थापनाने सुशिक्षित तरुणांचा डाटा तयार करून द्यावा. जेणेकरून नोकरीसंदर्भात त्यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन शिवसेनेच्या माध्यमातून शिष्टमंडळास दिले, असे अंकुश जोगदंड यांनी सांगितले.



No comments:
Post a Comment