प्रभाग क्र. ४७ चोळे गावात कोविशिल्ड लसीकरण शिबीराचे आयोजन !!
कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रभाग प्रभाग क्र. ४७ चोळे गाव येथे आज कोविशिल्ड लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे यांच्या मार्गदर्शनाखाली सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष संकेत लोके ह्यांनी कोविशिल्ड लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.
तसेच या कोविशिल्ड लसीकरण शिबीर मोहिमेत शंभरहून जास्त नागरिकांनी लसीचे डोस घेतले. तसेच प्रभाग क्र. ४७ चोळे गावात कोविशिल्ड लसीकरण शिबीर चार दिवस चालू राहणार असे सेवादलचे जिल्हा उपाध्यक्ष संकेत लोके ह्यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव संतोष केणे, डोंबिवली ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ म्हात्रे, सेवादलचे जिल्हाध्यक्ष लालचंद तिवारी, ब्लॉक काँग्रेसचे सरचिटणीस प्रणव केणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पमेश म्हात्रे, जिल्हा सरचिटणीस राहुल केणे, शिब्बू शेख व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते या कोविशिल्ड लसीकरण शिबीर मोहिमेत उपस्थित होते.



No comments:
Post a Comment