वेद फाउंडेशन बालिका समवेत नाताळ साजरा !! 'बालिकांना वस्त्र तथा पौष्टिक आहाराचे वाटप'
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
डिसेंबर गोरेगाव स्थित विशेष व्याधिग्रस्त बालिकांसाठी स्थापित आश्रमाला प्रत्यक्ष भेट देऊन बालिकांना वस्त्र तथा पौष्टिक आहाराचे वाटप वेद फाउंडेशन द्वारा करण्यात आले. कवयित्री, लेखिका तथा बृ. मनपा कामराज नगर हिंदी शाळेच्या शिक्षिका सौ. मंजू सराठे आणि बृ. मनपा. एन वाॅर्डचे डॉ. वैभव गजानन पाटील यांच्या निधी द्वारे उपलब्ध वस्त्र आणि पौष्टिक आहाराचे वाटप या प्रसंगी करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मान. श्री स्वप्निल नंदकुमार वाडेकर, संस्थेच्या सल्लागार सन्मा. सौ. सोनल गांधी, साई परिवाराचे अध्यक्ष सन्मा. श्री मंगेश रासम तथा अंकुश रासम उपस्थित होते. श्रीमती सराठे यांनी बालिकाशीं संवाद साधला आणि चॉकलेट्सचे वाटप करून त्यांच्यासोबत नाताळ साजरा केला. संस्था अध्यक्षांनी या स्तुत्य उपक्रमासाठी सौ.मंजू सराठे आणि डाॅ.वैभव जी.पाटील यांचे सन्मानपत्र देऊन गौरव करीत आभार मानले.

No comments:
Post a Comment