आदर्श शिक्षिका सौ. मंजू सराठे "कोरोना योद्धा" सन्मानाने सन्मानित !!
मुंबई-घाटकोपर, (शांताराम गुडेकर) :
महानगर पालिकेच्या "एन" वॉर्ड कार्यालयात सहायक आयुक्त एन विभाग सन्मा. संजय सोनवणे यांच्या हस्ते "कोविड-योद्धांना" सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यात एन वार्डच्या प्रशासकीय अधिकारी (शाळा) सन्मा. ज्योती बकाणे मॅडम व समस्त विभाग निरीक्षक उपस्थित होते.
कोविंड-१९ या महामारी मध्ये उद्भवलेल्या भयावह परिस्थितीमध्ये, मे महिन्यात कोरोनाचा वाढता कहर, वाहनांची सोय नसताना, आपला जीव धोक्यात घालून जनसेवा करणाऱ्या कामराज नगर मुंबई महानगरपालिका हिंदी शाळेच्या महापौर पुरस्काराने सन्मानित तसेच विविध राष्ट्रीय पुरस्काराने पुरस्कृत आदर्श शिक्षिका, साहित्यिका, कवयित्री, समाजसेविका श्रीमती मंजू सराठे यांना कोरोना योद्धा सन्मान पत्राने सन्मानित करण्यात आले. शालेय मुख्याध्यापिका श्रीमती निशा यादव यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे भरभरून कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. श्रीमती सराठे यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार मानले. सराठे यांचा सन्मान झाल्याबद्दल त्यांना अनेकांकडून अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.


No comments:
Post a Comment