Wednesday 22 December 2021

विवेकानंद विद्यालयात चित्रमय गणित दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा !!

विवेकानंद विद्यालयात चित्रमय गणित दिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा !!


चोपडा, बातमीदार : येथील विवेकानंद विद्यालयात आज 22 डिसेंबर 2021 राष्ट्रीय गणित दिवस गणिततज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून साजरा करण्यात आला. 


विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पटांगणावर एकत्र येऊन MATHS DAY हे नाव तयार करीत रंगभरण स्पर्धेत सहभागी होऊन ती संपन्न केली. गणित दिवसानिमित्त गणितावर आधारित रंगभरण स्पर्धा कलाविषया मार्फत विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांच्या संकल्पनेतून व सर्व शिक्षकवृंद यांच्या सहकार्याने व मुख्याध्यापक नरेंद्र भावे यांच्या मार्गदर्शनाने संपन्न झाली.या उपक्रमासाठी विद्यालयातील गणित शिक्षक सरला शिंदे, नूतन अत्तरदे, अजय पाटील, गौरव पाटील, राजेश्वरी भालेराव यांनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !!

रविवार ५ मे रोजी कल्याणात सकल धनगर समाज वधूवर मेळावा !! कल्याण, प्रतिनिधी - विवाह जुळवणे हि दिवसेंदिवस कठिण समस्या झाली असून एका...