मध्यप्रदेशातील ओबीसी आरक्षणाला स्थगिती मिळताच केंद्रातील मोदी सरकारचे थोबाड फुटले ; महाराष्ट्राबाबत अन्याय का -जयदीप सानप
महाराष्ट्र प्रतिनिधी, हेमंत रोकडे : मध्य प्रदेशातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर केंद्र सरकार सर्वोच्च न्यायालयात ट्रिपल टेस्ट जजमेंट चॅलेंज करणार आहे आणी दरम्यानच्या काळात देशभरात OBC राजकीय आरक्षण चालू ठेवावे यासाठी लवकरच याचिका दाखल करणार आहे. ही माहिती केंद्र सरकारनेच ( सोबत PIB चे पत्रक ) प्रसिद्धीपत्रक काढून दिली आहे. हीच तत्परता महाराष्ट्रातील ओबीसींच्या आरक्षणाच्या वेळी का दिसून आली नाही असा सवाल कल्याण जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष / जयदीप सानप यांनी केला आहे.
ओबीसींना न्याय देण्यासाठी केंद्र पुढाकार घेत असेल तर ते स्वागतार्हच आहे. परंतु महाराष्ट्रातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी महाविकास आघाडी सरकारने अलिकडेच दाखल केलेल्या याचिकेला याच कृष्णमुर्ती प्रकरणामुळे धक्का लागला होता. महाराष्ट्रातील राज्य सरकारच्या याचिकेच्यावेळी मौन बाळगायचे, इम्पेरिकल डेटा न देण्याची नकारात्मक भूमिका घ्यायची, याचिका फेटाळल्यानंतर महाराष्ट्रातील ओबीसींना मदत करण्यासाठी तातडीने काहीच करायचे नाही आणि मध्य प्रदेशची याचिका फेटाळल्याबरोबर थेट कृष्णमुर्ती निवाड्याला आव्हान देण्याची तयारी करायची, हा दुजाभाव असल्याचा आरोप कल्याण जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष जयदीप सानप यांनी केला आहे.
**आता तरी राज्यसरकार विरोधात चंद्रकांत पाटील, फडणवीस ओबीसींची दिशाभूल करणे थांबवतील व बीजेपी मधील आमच्या ओबीसी बांधवांचे डोळे उघडतील आणि नेमके दोषी कोण आहे हे (कदाचित) त्यांना कळण्याची सदबुध्दी येईल.

No comments:
Post a Comment