अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सातारा शाखेचे कौतुकास्पद काम !!
कल्याण, (संजय कांबळे) : अत्यंत अडचणीच्या व संकटकाळात आपल्या चित्रपट महामंडळ कलाकार आणि तंत्रन्य सभासदांना काम मिळण्यासाठी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ सातारा शाखेतर्फे केलेले काम हे राज्यात कौतुकास्पद असून इतर शाखानी याचा आदर्श घ्यायला हवा असे मत सभासदांमधून व्यक्त केले जात आहे यामागे शाखा अध्यक्ष महेंश देशपांडे यांची तळमळ व मेहणत असल्याचे अनेकांनी बोलून दाखवले.
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि सातारा आदी जिल्ह्यात शाखा आहेत, सुमारे ५४ हजाराच्या आसपास सभासद असून सर्वाधिक सभासद हे मुंबई शाखेचे आहेत, या खालोखाल पुणे, कोल्हापूर, औरंगाबाद याचा समावेश होतो. गेल्या दिड दोन वर्षांपासून कोरोनाच्या संकटाचा फटका चित्रपटात, नाट्य क्षेत्रांलाही मोठ्या प्रमाणात बसला आहे, अनेक निर्मिते, दिग्दर्शक, कलाकार, पडद्यामागील मंडळी यांची खूपच वाईट स्थिती निर्माण झाली होती. भरमसाट फी घेऊन ही चित्रपट महामंडळाच्या विविध शाखानी या सभासदांसाठी विशेष असे काही केले नसले तरीही चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले यांनी संपूर्ण महाराष्ट्रात फिरून मंडळातर्फे विविध ठिकाणी भरघोस आर्थिक मदत केली होती..
अगदीच ४/५ वर्षातच ७ सभासदांवरुन १५०० सभासद संख्या झाली आहे. ऐवढेच नव्हे तर त्यांच्या साठी कामेही अशीच केली आहेत.
२आँक्टोबर महात्मा गांधी जंयती दिवशी राजयोग हॉटेल सातारा येथे ऑडिशन घेण्यात आले. ही ऑडिशन फक्त अ. भा. मराठी चित्रपट महामंडळ सभासदांसाठीच असल्यामुळे आपल्या सातारा शाखेने कार्ड धारक कलाकारांना मदत करण्याचा केलेला प्रयत्न फक्त अ भा मराठी चित्रपट महामंडळ करत असल्याचा अभिमान वाटत होता. इतर कोणत्याही संघटना असे प्रयत्न करत नाहीत.
या ऑडिशनसाठी चित्रपट महामंडळ अद्यक्ष मेघराजराजे भोसले, उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक रणजित बाळा जाधव, सतीश बिडकर, प्रमुख शाखा व्यवस्थापक रविन्द्र बोरगावकर, सिद्धेश, चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद जी सर्वे, जिल्हा परिषद सदस्य संदीपभाऊ शिंदे, निर्माता दिग्दर्शक सुरेश कांबळीकर, बाजींद मन झालं या सिरीयल चे निर्माते लेखक तेजपाल वाघ, निर्माते दिनेश देशपांडे, मुलगी झाली हो सिरीयल तर्फे सचिन ससाणे, मकरंद गोसावी, सचिन पाटील, निर्माते दिग्दर्शक सागर मोहिते, धोंडिबा कारंडे, अभिजित वाईकर, वासू पाटील, प्रवीण पाटील, विशाल कदम, कुर्डवाडीचे आतकर, श्याम पाटील, अतरंगी कार्टी चित्रपटासाठी अनिल वांगडे, पंकज चव्हाण, रवी पायमल, दाऊद शेख, ईश्वर मोरे, निर्माते दिग्दर्शक गणेश शिंदे, नितीन सूर्यवंशी, अभिनेत्री सुनंदा शेंडे, सीमा दडस, कुमुदिनी आदाटे, वर्षा वैद्य, धनंजय पाठक, दिग्दर्शक प्रवीण पाटील उपस्थित होते. कराडहून जगदीश दडस, नंदू भगत, मानसिंग कदम, शंकर उमापे, शिवलिंग पाठक, पुण्याहून विनय जवळीकर, वैद्य, अभिनेते गजानन गडकर असे अनेक जण उपस्थित होते..
त्या ऑडिशन साठी भागातील सातारा, कोल्हापूर येथे चालू असलेल्या आणि नवीन चालू होणाऱ्या सिरीयल, वेब सिरीयल, ott प्लॅटफॉर्म सिरीयल, फिल्म आणि शॉर्ट फिल्म्स, निर्मिती संस्था यांचे कास्टिंग डिरेक्टर, दिग्दर्शक, निर्माते, सन्माननीय व्यक्ती, संचालक उपस्थित होते.
तसेच या ऑडिशन चा डेटा हिंदी मराठी प्रोड्युसर यांनाही लवकरच देण्यात येणार आहे. जेणेकरून जास्तीत जास्त सभासदांना काम मिळेल.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यास परिश्रम घेतलेले सचिन आवळे जेवण विभाग , कॅमेरा ऑपरेटर महेश नलवडे, पोपट सानप, संकलक कमलाकर सोनवणे, एस के दादा, घनश्याम सावंत, ऋषिकेश सावंत, बच्चन राजयोग हॉटेल टीम आणि न्यात अज्ञात यांचे सातारा शाखेतर्फे महेश देशपांडे यांनी मनःपूर्वक आभार मानले.
ऐवढयावरच न थांबता अनेकांना कोरोनाच्या काळात जेवढी शक्य तितकी मदत केली, सातारा जिल्ह्यात शुटिंग असल्यास त्यांना परवानगी, पोलिसांनकडून सहकार्य, गावगुडांकडून होणारा त्रास, याशिवाय सभासदांना तसेच व्यावसायिकांना व्यवसाय वाढीसाठी पँथालाँजि, डॉक्टर, हाँटेल यामध्ये डिस्काऊंट आदी साठी सातारा शाखा नेहमीच आघाडीवर असते असे शाखा अध्यक्ष, महेंश देशपांडे यांनी सांगितले. तर राज्यातील सर्वच शाखेचे अत्यंत समाधान कारक व उत्तम काम सुरू असून महामंडळातर्फे कोरोना काळात भरघोस आर्थिक मदत केली असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजे भोसले यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment