कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसीच्या माधान्यमातून मुक आदोलन !!
कल्याण, हेमंत रोकडे : कल्याण पश्चिम येथे आज छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून पुष्पहार अर्पण करून शिवाजी चौक येथे ओबीसी आरक्षण नाही तो पर्यंत कोणत्याही निवडणुका नाही या सदर्भात केंद्र शासनाच्या विरोधात लोकशाही मार्गाने काळी पट्टी बांधून झेंडे बॅनर वापरून जाहीर निषेध व्यक्त करत करण्यात आला.
तसेच पोलीसानी परवानगी नाकारल्याने रस्ता रोको आंदोलन न करता मुक आंदोलन करण्यात आले. यात प्रमुख मागणी आरक्षण नाही तो पर्यंत निवडणूक घेऊ नयेत, लवकरच दिल्ली मध्ये जंतर मंतर आंदोलन करू अशा इशारा कल्याण जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी अध्यश जयदीप सानप यांनी या वेळी दिला.
तसेच मुक आदोलन या कार्यक्रमाचे मार्गदशक जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी प्रकाश मुथा यांच्या नेतृत्वात घेण्यात आले.
या वेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी लखपत सिंह राजपूत, महाराष्ट्र ओबीसी सचिव सौ संगीता भोईर, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कल्याण राजा जाधव, कल्याण पू. बाळा बर्वे, डोंबिवली निवृत्ती जोशी, डोंबिवली ग्रामीण सूर्यकांत मंडपे, उप अध्यक्ष चंद्रकांत पाटील, स्वप्नील छत्तीसकर, सचिव माणिक सानप, संघटक हाफिज कुरेशी, नितीन चौधरी, रियाज शेख, अनिल पवार, जावेद शेख, प्रसिद्धी प्रमुख कोणार्क देसाई, जावेद मुल्ला, शफीक शेख इतर शेकडो कार्यकर्ते यानी मुक आदोलनात सहभाग घेतला.




No comments:
Post a Comment