Tuesday, 21 December 2021

कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांना केंद्रीय मानव एकाधिकार संघटनेचा " जीवन गौरव " पुरस्कार प्रदान ! *नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धे गावच्या सुपुत्राचा जगाच्या पाठीवर नावलौकिक*

कमांडर डॉ. मनिलाल शिंपी यांना केंद्रीय मानव एकाधिकार संघटनेचा " जीवन गौरव " पुरस्कार प्रदान !

*नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील परिवर्धे गावच्या सुपुत्राचा जगाच्या पाठीवर नावलौकिक*


महाराष्ट्र प्रतिनिधी, संदीप शेंडगे - नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुका परीवर्धे गावच्या सुपुत्राने जगाच्या पाठीवर आपल्या दैदिप्यमान कामगिरीने नावलौकिक मिळविला असून यावर्षीचा मानाचा जीवनगौरव पुरस्कार नागपूर येथे प्रधान करण्यात आहे.

आर.एस.पी. कल्याण ठाणे यूनिट चे कमांडर डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी यांना महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन भारत - ओडिसा भुवनेश्वर युनिव्हर्सिटी यांनी महाराष्ट्राचे राजदुत (ब्रँड अँबेसेडर) म्हणून या अगोदरच त्यांची नियुक्ति केल्याबद्दल त्यांचा राजभवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले होते. त्यानंतर डॉ. मनिलाल शिंपी यांचे कार्य खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. त्यांना मिळालेल्या या सन्मानाची दखल घेऊन केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी दिल्ली यांच्या वतीने १० डिसेंबर २०२१ रोजी
मानव अधिकार दिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राष्ट्रभाषा पुणे विभाग श्री साई सभागृह नागपूर येथे न्यायाधीश अभिजित देशमुख, वरिष्ठ पोलीस अधीक्षक संजय पांडे, मुंबई येथील चित्रपट निर्माते दीपक कदम, ' गाववाले गोत्यात १५ लाख खात्यात ' या  मराठी चित्रपटातील मुख्य भूमिका साकारलेली अभिनेत्री
अश्विनी चंद्रकापुरे, मा. ब्रम्हाकुमारी मनिषादीदी, केंद्रीय मानव अधिकार संघटन नवी- दिल्ली चे संस्थापक अध्यक्ष डॉ.मिलिद दहीवले यांच्या प्रमुख उपस्थितित आर.एस.पी. कल्याण-ठाणे युनिटचे कमांडर तथा महाराष्ट्र राज्याचे राजदुत (ब्रँड अँबेसिडर) डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांचा "जीवन गौरव २०२१" या पुरस्काराने सन्मानपूर्वक सन्मान करण्यात आला. अत्यंत कमी कालावधीत मणिलाल शिंपी यांना मानाचे पुरस्कार मिळाल्याने दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ. किशोर बळीराम पाटील, कल्याण ठाणे यूनिट, आर. एस्  पी, अधिकारी, स्वामीनारायण ट्रस्ट कल्याण अध्यक्ष डॉ. दिनेश भाई ठक्कर, जीजस ईज लाईफ फाउंडेशन उल्हासनगर यांच्या वतीने डॉ. मणिलाल शिंपी यांचे
हार्दिक अभिनंदन करण्यात येत असून पुढिल वाटचालीसाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात येत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात असलेल्या एका छोट्याशा गावातून आपला जीवनप्रवास सुरू करून इतक्या मोठ्या पदावर विराजमान झाल्याने त्यांच्या परीवर्धे गावासह संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात त्यांच्या कार्याचे कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !!

कल्याण डोंबिवली काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ.राजकुमार (राजाभाऊ) पातकर यांच्या नेतृत्वात आरपीआय (आठवले) पक्षाचे पदाधिकाऱ्यांचा जाहीर प्रवेश !! ...