Thursday, 27 January 2022

टिटवाळयातील सिद्धिविनायक गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव सोहळा ओमायक्रोनमुळे रद्द !! *टिटवाळा सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा निर्णय*

टिटवाळयातील सिद्धिविनायक गणेश मंदिरात माघी गणेशोत्सव सोहळा ओमायक्रोनमुळे रद्द !!

*टिटवाळा सिद्धिविनायक मंदिर प्रशासनाचा निर्णय*


टिटवाळा, संदिप शेंडगे : टिटवाळा येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात मोठ्या उत्साहात पार पडणारा माघीगणेशोत्सव यावर्षी  मायक्रोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे.


गेल्या दोन वर्षापासून कोव्हीड - १९  च्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. काही अंशी मर्यादित भाविकांना प्रवेश देऊन राज्य सरकारने मंदिरे सुरू करण्यात परवानगी दिली आहे. त्यातच ओमायक्रोनचे नवे संकट आल्याने पुन्हा राज्य सरकारने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे यावर्षीचा यावर्षीचा माघी गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. परंतु श्री चा जन्मोत्सव मंदिरातील विश्वस्त व पुजारी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. कीर्तनास सर्वसामान्य ५० भाविकांना प्रवेश असणार आहे श्रींची पालखी दुपारी साडेचार वाजता निघणार असून मंदिराच्या प्रांगणात दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने दिली आहे 

No comments:

Post a Comment

NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सौ. स्मिता लंगडे यांचा विशेष गौरव !!

NDTV मराठी आयोजित Emerging Business Conclave या भव्य कार्यक्रमात मा. उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सौ. स्मिता लंगडे यांचा विशेष...