अभिजात मराठी साहित्य सेवा संघाची 'काव्य मैफिल' संपन्न !!
वाडा / बातमीदार :
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त अभिजात मराठी साहित्य सेवा संघाच्या, वाडा शाखेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर 'गाथा स्वातंत्र्याची - काव्य मैफिल' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महात्मा गांधी सार्वजनिक वाचनालय, वाडा येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमात वाडा, भिवंडी, कल्याण, शहापूर येथील कवींनी हजेरी लावून आपले स्वलिखीत काव्य सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ साहित्यिक मा. तु. खैरकर, प्रमुख पाहुणे म्हणून जि.प. सदस्या भक्ती वलटे, कोमसापचे जिल्हा खजिनदार जयेश शेलार, रंगतदार प्रकाशनचे विजय जोगमार्गे, जेष्ठ कवी भिमराव बोकंद, ज्ञानदा प्रकाशनचे युवराज ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश गोतारणे व तुषार ठाकरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवराज डोहाळे, ऋषिकेश सावंत, अमोल गोतारणे यांनी विशेष मेहनत घेतली. या कवी संमेलनात पालघर व ठाणे जिल्हयातील कवी सहभागी झाले होते.
'ग्रामीण साहित्यिकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, वाचन चळवळ समृद्ध करणे व बोलीभाषांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी अभिजात सेवा संघ काम करते. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त देशभक्त, शहिद जवान व राष्ट्राप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेने या कार्यक्रमाचे आयोजन केले असल्याचे अभिजातचे अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी सांगितले.




No comments:
Post a Comment