डोंबिवली पत्रकार संघाची नवीन कार्यकारिणी जाहीर !!
कल्याण, हेमंत रोकडे : डोंबिवली पत्रकार संघ २०२२-२३ ची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महावीर बडाला, सचिवपदी प्रशांत जोशी, उपाध्यक्षपदी शंकर जाधव आणि खजिनदारपदी सोनल सावंत-पवार यांनी एकमताने नियुक्ती करण्यात आली.
यावेळी मावळते अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी नवनियुक्त अध्यक्ष बडाला यांच्या हाती संघाची सूत्रे दिली. बडाला यांनी अध्यक्ष पदाची धुरा सांभाळल्यावर आपल्या पुढील कार्यक्रमाची थोडक्यात माहिती दिली. नवीन कार्यकारणीत पत्रकारांसाठी नवनवीन उपक्रम राबविणार असून त्यासाठी पत्रकार संघातील पदाधिकारी आणि सदस्यांचे सहकार्य अपेक्षित असल्याची विनंती केली. सचिव जोशी आणि उपाध्यक्ष जाधव वृत्तपत्राबाबत आपली मते मांडली.
तर खजिनदार सोनल सावंत-पवार यांनी सर्व सदस्यांचे आभार मानले.



No comments:
Post a Comment