उशीद ग्रामपंचायतीने दिलेली घरपट्टी ग्रामसेविकेने बेकायदेशीर रित्या घरी जाऊन आणली परत ? मनमानीस रोखणार कोण ?
कल्याण, (संजय कांबळे) : सध्या कल्याण तालुक्यात चाललयं तरी काय? असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. याचे कारण ही तसेच आहे, कल्याण तालुक्यात ग्रामसेवक अर्थात "भाऊसाहेब" कशी मनमानी, बेकायदेशीर कृत्य करत आहेत, याचे ज्वंलत उदाहरण समोर आले आहे. ते आहे, उशीद आरेला ग्रामपंचायतीचे !
याबाबत सविस्तर वृत्त असे की, मौजे उशीद आरेला ग्रामपंचायत हद्दीत सुरेखा सागर उघडे या आपले पती व तीन मुलासह राहतात, त्या गावातील स्थानिक रहिवासी असून मोलमजुरी करून कुंटूबाचा उदरनिर्वाह करतात, त्यांच्या घराच्या पाठिमागील जागा गावठाण असून तेथे एक कच्ची झोपडी होती, ती यांच्या च कब्जेवहिवाटीस असून त्याला घरपट्टी लावण्यासाठी तिचा मोठा मुलगा सिंकदर सागर उघडे याने १२ नोव्हेंबर २०२१ रोजी ग्रामपंचायतीकडे रितसर अर्ज केला होता. यांनतर सरपंच, सदस्यांच्या मासिक बैठकीत सिंकदर उघडे याला घरपट्टी देण्याबाबत सर्वानुमते ठराव मंजूर झाला आणि ५ जानेवारी २०२२ रोजी पावती क्रमांक ३०० रक्कम १०४, घरक्रं ३२६ अशी घरपट्टी दिली. यानंतर २०/२५ दिवसांनी घरी कोणी नसताना शिपाई दिलीप शिंगे आणि डाटा आँपरेटर यांना बरोबर घेऊन सिंकदर उघडे यांच्या घरी जाऊन लहान मुलगा कु सूरज सागर उघडे याला भूलथापांना देऊन, त्याची फसवणूक करून आम्हांला कोणालाही काही एक न कळवता, ग्रामपंचायतीने दिलेली घरपट्टी ग्रामसेविका श्रीमती माधुरी राठोड यांनी बेकायदेशीर, गैरकृत्याने परत नेली. ही मनमानी, दादागिरी नव्हे काय? असा सवाल उपस्थित करून मासिक मिंटिगमध्ये ठराव संमत झाला असताना, कोणाची तक्रार नसताना, आम्ही घरात नसतात, चोराप्रमाणे येवून घरातील घरपट्टी परत घेऊन जाण्याइतपत यांची हिंम्मत कशी झाली? असा संताप व्यक्त करुन संबंधित ग्रामसेविकेला निंलबित करावे अशी मागणी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांच्या कडे लेखी तक्रारीव्दारे केली आहे. कारवाई न झाल्यास "घरपट्टी" चोरीला गेल्याची तक्रार पोलीस ठाण्यात करण्याच्या विचारात असल्याचे श्रीमती सुरेखा सागर उघडे यांनी सांगितले.
एकूणच काय तर कल्याण तालुक्यात डझनभर लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, झेडपी सदस्य, सभापती, उपसभापती, सदस्य, तर त्यांचे शेकडो कार्यकर्ते आहेत, असे असताना ग्रामसेवक इतकी मनमानी, करु शकतात, याचा अर्थ काय? घरपट्टी च्या मलिद्यात हिस्सा घेणारे हे रोखू शकतात का? आपणास निवडून देणाऱ्या मायबाप जनतेचा कोण विचार करणार?याचा सर्व लोकप्रतिनिधी नी विचार करायला हवा, काळ कोणालाही सोडणार नाही हे संबंधितानी लक्षात घ्यावे, आणि वेळीच अशा प्रवृत्ती रोखायला हव्यात, अन्यथा प्रशासनात चांगले काम करणारे ग्रामसेवक, ग्रामसेविका यांच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलेल.
दरम्यान या पुर्वीही या ग्रामसेविका मुरबाड तालुक्याती फांगलोसी या ग्रामपंचायतीला होत्या, तेथे देखील यांच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल झाल्याची माहिती मिळत असून जिल्ह्याला देखील तक्रारी गेल्या आहेत असे समजते. तर या संदर्भात माहिती घेण्यासाठी व मत जाणून घेण्यासाठी कल्याण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना भेटण्यासाठी गेलो असता ते रजेवर गेल्याचे सांगितले तर उशीद ग्रामपंचायतीचे प्रशासक एस एस संत यांना विचारले असता, आपणास माहिती नाही, माझ्या कार्यकाळातील नाही त्यामुळे आपण यावर बोलू शकत नाही असे उत्तर दिले.
*प्रतिक्रिया
आम्ही मोलमजुरी करुन पोट भरतो, तुम्हाला घरी यायचे होते तर आम्हाला कळविले का नाही? घरी कोणी नसतांना येण्याचे काय कारण? त्यांच्या वर कारवाई झाली पाहिजे- श्रीमती सुरेखा उघडे, मुलाची आई, उशीद, ता. कल्याण.



No comments:
Post a Comment