गुहागर प्रतिष्टान (रजि) कला, क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणतर्फे राजेंद्र स.भुवड यांचा सत्कार !!
मुंबई, (शांताराम गुडेकर) :
गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ ग्रामीण आयोजित वर्धापन दिन आणि प्रजासत्ताक दिनानिमित्त महा रक्तदान शिबिर विरार येथील जिल्हा परिषद मराठी शाळा मनवेल पाडा तलाव जवळ विरार पुर्व येथे संपन्न झाला.मंडळाच्या वतीने सह्याद्री कुणबी संघ पुणे शहर महाराष्ट्र रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख राजेंद्र स.भुवड यांचा शाळ,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी गुहागर प्रतिष्टान (रजि) कला,क्रिडा, शैक्षणिक, सामाजिक मुंबई/ग्रामीणचे पदाधिकारी, सदस्य व सभासद मोठया संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment