Tuesday, 25 January 2022

महापालिका मुख्यालय राष्ट्रीय मतदार दिन ऊत्साहात साजरा !!

महापालिका मुख्यालय राष्ट्रीय मतदार दिन ऊत्साहात साजरा !!


कल्याण, हेमंत  रोकडे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत राष्ट्रीय मतदार दिन ऊत्साहात साजरा करण्यात आला. निवडणूक प्रक्रियेतील नागरिकांचा सहभाग वाढावा म्हणून सदर दिवसाचे औचित्य साधून महापालिकेतील कर्मचा-यांना आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ देऊन मतदान करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आवाहन करण्यात आले. 


महापालिका मुख्यालयात मतदार दिनाचे औचित्य साधून मनोहर साबळे व भिकू बारस्कर या दोन जेष्ठ मतदारांचा (नागरिकांचा) अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांचे हस्ते शाल व तुळशीचे रोप देवून सत्कार करण्यात आला. सदर समयी निवडणूक उपआयुक्त सुधाकर जगताप, उपआयुक्त बाळासाहेब‍ चव्हाण, डॉ.रामदास कोकरे, विनय कुलकर्णी, अर्चना दिवे, मख्य लेखा अधिकारी सत्यवान उबाळे, महापालिका सचिव तथा विभागप्रमुख जनसंपर्क संजय जाधव, सहा. आयुक्त इंद्रायणी करचे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी यांनी देखील मतदार दिनानिमित्त शपथ घेतली . 


त्याचप्रमाणे महापालिकेच्या इतर विभागात तसेच सर्व प्रभागातही  संबंधीत सहा.आयुक्त यांच्या उपस्थितीत  अधिकारी व कर्मचारी यांनी देखील राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त शपथ घेतली त्याच प्रमाणे काही प्रभागात मतदारांना निवडणूक मतदार पत्र देऊन, मतदारांचा गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. तसेच या मतदार दिनाचे औचित्य साधून महापालिका मुख्यालयात चित्तवेधक रांगोळी काढून मतदार जनजागृती करण्यात आली.

No comments:

Post a Comment

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित....

प्रभाग क्रमांक ११ मधुन शिवसेने कडुन रूचिता नाईक यांची उमेदवारी निश्चित.... **भाजप मधुन मनोज पाटील राजु ढगे यांची नावे आघाडीवर.. ...