संत गाडगे महाराज यांच्या जयंती दिनी महानगरपालिकेतर्फे अभिवादन !
कल्याण, हेमंत रोकडे : थोर समाज सुधारक संत गाडगे महाराज यांचे जयंती दिनी आज महापालिकेतर्फे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महापालिका मुख्यालयात महापालिका सचिव संजय जाधव यांनी संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित घनकचरा विभागाचे उपआयुक्त रामदास कोकरे, कर विभागाचे उप आयुक्त विनय कुलकर्णी , माहिती व जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी देखील संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.

No comments:
Post a Comment