कुणबी सुपुत्र उद्योजक दिलीपभाऊ सुकम आणि त्यांचे सहकारी कांबळे बंधू यांनी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सुईतुळजा या हाँटेलचा संपूर्ण पहिला मजला फाँमिली बैठक साठी खुला !!
मुंबई, (शांताराम गुडेकर/दिपक फणसळकर) :
रत्नागिरी जिल्हा तालुका संगमेश्वर दाभोळ गावाचे कुणबी सुपुत्र उद्योजक दिलीपभाऊ सुकम आणि त्यांचे सहकारी कांबळे बंधू यांनी महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर सुईतुळजा या हाँटेलचा संपूर्ण पहिला मजला फाँमिली बैठक साठी सुरू केला. दिलीपभाऊ काही वर्षांपूर्वी हाँटेल नोकरीसाठी गावावरून पुण्यात आले पुण्यात नोकरी करत असताना त्यांना सारखे मन सतावत होते की आपण उत्तमरीत्या आचारी आहोत आपल्यामुळे काम करत असलेल्या हाँटेलमध्ये चांगल्या चवीमुळे ग्राहक परत चवीष्ट खाण्यासाठी येते मग आपण व्यवसाय करायला काय हरकत आहे आणि हाच विचार करून त्यांनी एक वर्षांपूर्वी हाँटेल व्यवसायाला सुरुवात केली आणि दुसऱ्या वर्षातच त्यांनी फाँमिलीसाठी स्वतंत्र बैठक सुरू केली. हे फक्त त्यांच्या चवदार रुचकर जेवणामुळे व अथक प्रयत्नामुळे हे सर्व शक्य झाले असे मनोगत उद्योजक दिलीपभाऊ सुकम यांनी व्यक्त केले. खरच समाज्यातील तरुण बांधवांनी त्यांच्या आदर्श डोळ्यासमोर ठेवून प्रत्येकाने व्यवसायात उतरले पाहिजे. उद्घाटनप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी सह्याद्री कुणबी संघ आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित होती.

No comments:
Post a Comment