राज्यातील ग्रामपंचायत कर्मचारी मंत्रालयावर धडकणार, विविध मागण्यांसाठी निर्धार मोर्चा !!
कल्याण, (संजय कांबळे) : महाराष्ट्रातील विविध ग्रामपंचायतीचे कर्मचारी अंत्यत कठीण परिस्थितीत गावविकासामध्ये मोलाचे योगदान देत असताना अशा ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे विविध प्रकारचे प्रश्न गेल्या २० वर्षांपासून प्रंलबित आहेत, त्यामुळे आता त्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असून सरकारला एकच जोरदार 'धक्का' देण्यासाठी येत्या ९ मार्च रोजी राज्यातील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी मंत्रालयावर धडकणार असून हा "निर्धार" मोर्चा असणार आहे असे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव यांनी सांगितले आहे.
राज्यात २७ हजार ९२० ग्रामपंचायती असून यामध्ये ६० हजार च्या आसपास कर्मचारी आहेत, यांच्या वेतनाचा प्रश्न गेल्या २० वर्षांपासून प्रंलबित आहे. याबाबत १० जुलै २०१८ रोजी नागपूर येथील लाँग मार्च तसेच ७ जानेवारी २०१९ ला लातूर येथे भव्य अधिवेशन भरविले यावेळी तत्कालीन ग्रामविकासमंत्री दादा भुसे यांनी कामगारांच्या सर्व मागण्या मंजूर करण्याचे आश्वासन दिलं होत.याशिवाय २० जानेवारी २०२० रोजी राज्यातील ३४ जिल्ह्यामधून जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. मात्र त्यांच्या मागण्या अद्यापही मान्य करण्यात आल्या नसल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. तो ९ फेब्रुवारी रोजी निर्धार मोर्चाच्या रुपाने बाहेर पडणार आहे.
या मोर्चात कर्मचाऱ्यांना सुधारित किमान वेतन लागू करणे, नगरपरिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे वेतणश्रेणी मंजूर करणे, निवृत्ती वेतन व उपदान योजना लागू करणे, भ.नि निधीची रक्कम कामगार भविष्य निधी संघटन या कार्यालयात जमा करणे, आकृती बंधात सुधारणा करणे, कर्मचा-यावर लादलेली वसुलीची अट रद्द करून १०० टक्के अनुदान मिळणे यासह इतरही मागण्यांचा समावेश आहे.
तसे पाहिले तर शहराजवळील किंवा चांगल्या उत्पन्न असणाऱ्या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे कसेबसे चालते, परंतु ग्रामीण भागातील डोंगर वसत्या, वाड्या पाड्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची खूपच वाईट परिस्थिती आहे, त्यांना अनेक अडचणी, समस्या, प्रश्न सतावत असतात. अशा ही परिस्थितीत कोरोना काळात, अनंत संकटाना सामोरं जाऊन खूपच चांगले काम केले होते. त्यामुळे ते ख-या अर्थाने 'कोरोना योध्दा' ठरले होते. अनेक गुणी कर्मचारी ग्रामसेवक नसले तरी अंत्यत चांगल्या प्रकारे ग्रामपंचायत सांभाळून गावातील अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करतात. आपल्या बुद्धी कौशल्याच्या जोरावर गावविकासामध्ये मोलाचे योगदान देतात. हे शंभर टक्के खरे असले तरी काही कामचुकार, मनमानी करणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या कर्मचाऱ्यांच्या मुळे संपूर्ण संघटना बदनाम होते याचाही विचार वरीष्ठांनी वेळीच करायला हवा.
तथापि इमानेइतबारे काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा शासनाने सकारात्मक विचार करून त्यांच्या मागण्या मान्य करायला हव्यात असेच सर्वाचे मत आहे. त्यामुळे ९ फेब्रुवारीच्या मुंबई मंत्रालयावरील निर्धार मोर्चामध्ये मोठ्या संख्येने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी सामील व्हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन चे ठाणे जिल्हा अध्यक्ष अजय जाधव, कोकण विभाग अध्यक्ष दत्ता भोईर, कार्याध्यक्ष विकास भोईर, प्रकाश जाधव, उपाध्यक्ष कबीर भोईर, सचिव अजय चोरगे, सहसचिव के. पी. पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी केले आहे.




No comments:
Post a Comment