Wednesday, 2 March 2022

कल्याण मधील गौरीपाडा तलावतील 80 कसवांचा घातक विषाणूमुळे मृत्यू !!

कल्याण मधील गौरीपाडा तलावतील 80 कसवांचा घातक विषाणूमुळे मृत्यू !!


भिवंडी, दिं,2, अरुण पाटील (कोपर) : कल्याण मधील गौरीपाडा तलावातील ८० कासवांचा मृत्यू पोटात गेलेल्या घातक विषाणूमुळे झाला असल्याचा अहवाल प्राणी चिकित्सा प्रयोगशाळेने वनविभागाने दिला आहे. या तलाव परिसरात सांडपाणी वाहून येणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन पालिका प्रशासनाला करण्यात येणार आहे, अशी माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
            गेल्या महिन्यात गौरीपाडा येथील तलावात ८० कासवं मरून पडली होती. एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने कासवांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली होती. वन अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, पालिका अधिकारी, प्राणीमित्र संस्थांचे पदाधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते. कासवांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याविषयी विविध तर्क लढवले जात होते. मृत कासवांचा व्हिसेरा उत्तर प्रदेशातील प्राणी चिकित्सा प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आला होता.
         आता हा अहवाल वन विभागाला प्राप्त झाला आहे. घातक विषाणू मोठ्या प्रमाणात पोटात गेल्यामुळे यकृत खराब झाले आणि त्यामुळे या कासवांचा मृत्यू झाला आहे असे अहवालात म्हटले आहे. या तलावातील पाणी स्वच्छ राहील याची काळजी घेण्याचे आवाहन पालिकेला करण्यात येणार आहे असे विभागीय वन अधिकारी आर एन चन्ने यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

शाहीर जयंत चव्हाण (बापू) कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !!

शाहीर जयंत चव्हाण (बापू)  कलगी तुरा शाहिरी पुरस्कार २०२५ ने सन्मानित !! मुंबई (शांताराम गुडेकर)               बालपणापासून गायन व...