Monday, 28 March 2022

पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशनची स्थापना !! "वृत्तपत्र, छायाचित्रकाराच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करेन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आश्वासन"

पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशनची स्थापना !!

"वृत्तपत्र, छायाचित्रकाराच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करेन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे  आश्वासन"


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

            मुंबईतील वृत्तपत्र, छायाचित्रकार यांच्या पॉलिटिकल फोटो जर्नालिस्ट असोसिएशनचे नुकतेच राज्याचे मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. मुंबईतील अग्रगण्य दैनिक आणि वृत्तसंस्थांत राजकीय बिट पाहणाऱ्या छायाचित्रकाराचा या असोसिएशन मध्ये समावेश असून गेली अनेक वर्षे मुंबई व महाराष्ट्रातील विविध दैनिकांत व वृत्तसंस्थांत हे छायाचित्रकार काम करतात. सन्मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत स्थापन केलेल्या या कार्यक्रम प्रसंगी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार दिलीप लांडे, फोटो जर्नालिस्टचे अध्यक्ष राजेश जाधव, सचिव स्वप्नील शिंदे, संदीप पागडे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते. 

वृत्तपत्र, छायाचित्रकाराच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य करेन असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आश्वासन दिले.

No comments:

Post a Comment

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...