दुर्लक्षित आणि दुर्लबांसाठी कल्याण चे ओमकार हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्ट डॉ. सतीश पाटील ठरले आरोग्यदूत !!
"गरीब व गरजू नागरिकांच्या उपचारासाठी ओमकार हॉस्पिटल सदैव कार्यशील असेल- डॉ. सतीश पाटील"
कल्याण, बातमीदार : आजही आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी डॉक्टरास परमेश्वराचे रूप मानले जाते. दुर्धर आजारातून मुक्त झाल्यावर किंवा अपघातानंतर मृत्यूशी झुंज देऊन पुन्हा जीवन सुरळीत झाल्यानंतर अनेकांना डॉक्टरांमुळे पुनर्जन्म मिळाला, अशी भावना असते. ते तसे बोलूनही दाखवितात. अनेक रुग्णांसाठी, त्यांच्या नातेवाइकांसाठी डॉक्टर हा त्यांच्या आयुष्यात आलेला "देवदूत' ठरत असतो. त्यांच्या कौशल्याने, ज्ञानाने अनेकांना जीवदान मिळते.
पोटातील गाठ फुटल्याने त्रास सुरू झालेल्या ३६ वर्षीय रुग्णाला डॉक्टरांच्या तत्परतेमुळे उपचार मिळाले. यामुळे रुग्णाचे प्राण वाचले असून, डॉक्टरांनी (Doctor) दाखवलेल्या प्रसंगावधानाने त्यांचे कौतुक होत आहे.
राजेश्वरी उघाडे यांच्या पोटात अचानक दुखू लागले. त्यांनी फॅमिली डॉक्टर यांच्याकडे तपासणी केली. मात्र, डॉक्टरांनी त्यांना कुठल्याही विलंब न करता खाजगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला येथे जाण्याचा. यानंतर ते रुग्णाला घेऊन मीरा हॉस्पिटलमध्ये गेले पण आर्थिक परिस्थिती नसल्याने मीरा हॉस्पिटल ने त्यांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा सल्ला दिला. रुग्णाच्या पतिने त्यांना टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तेव्हा डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता रुग्णाच्या पोटातील गाठ फूटली आहे सदर गाठ कॅन्सरची असू शकते, रुग्णाच्या पोटातीळ गाठ फुटल्याने संपूर्ण शरीरात इन्स्पेक्शन झाल्याने रुग्णाला त्रास होत असल्याचे निदान झाले. सदर रुग्णांची वाचण्याची जास्त शक्यता नाही डॉक्टराने सल्ला दिला रुग्णाच्या नातेवाईकांच्या पाया खालील जमीन सरकली. आर्थिक परिस्थिती मुळे उपचारासाठी पैसे नसल्याने पत्नी व तीन मुलाची आई आपल्यातून निघून जाणार, अशी परिस्थिती उफाडे परिवार दुखाच डोगर पसरला तेव्हा कचोरे परीसरातील प्रहार जनशक्ती पक्ष कल्याण तालुका संघटक डॉ. आदर्श भालेराव यांना माहिती मिळताच भालेराव यांनी तात्काळ कल्याण पश्चिम येथील ओमकार हॉस्पिटलचे मेडिकल डायरेक्ट डॉ. सतीश पाटील यांना माहिती दिली असता सदर रुग्णाची परस्थिती अत्यंत बिकट असल्याने उपचारासाठी पैसे नाही पैसे नसल्याने रुग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे ही बाब कळताच डॉ. पाटील यांनी रुग्णाला ओमकार हॉस्पिटलमध्ये घेऊन या म्हणून सल्ला दिला.
डाँक्टरांची तळमळ....
डॉ. आदर्श भालेराव यांनी नियोजित कामे बाजुला ठेवत २१ मार्च २०२२ रोजी रात्री ११ च्या सुमारास राजेश्वरी उघाडे यांना होत असलेल्या वेदना लक्षात घेता दिलावर पठाण, सुनील माने यांच्या सोबत ओमकार हॉस्पिटल कल्याण पश्चिम यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वतः घेऊन गेले. तेथे तत्काळ डॉ. शारीक गिरासे यांनी रुग्णाला ऍडमिट करून घेण्याचा निर्णय घेतला. यामुळे त्यांच्यावर ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत रात्रीचे दीड वाजले डॉ. सतीश पाटील स्वतः डॉ. शरीक गिरासे यांच्यासोबत थांबून त्यांना सर्व प्रकारची मदत व धीर देण्याचे काम केले.
सदर रुग्ण महिलेला वेळेवर उपचार मिळाल्याने रुग्ण महिलेचा जीव वाचविण्यास डॉ. सतीश पाटील यांना यश आले. सदर ८ दिवसांपासून ओमकार हॉस्पिटलमध्ये रुग्ण महिलेचा उपचार कोणती मोबदला न घेता सुरू असल्याने कल्याण कचोरे परिसरातील नागरिकांनी प्रहार जमशक्ती पक्षाचे कल्याण तालुका संघटक डॉ. आदर्श भालेराव हे वेळेवर धावून आल्याने ओमकार हॉस्पिटल चे मेडिकल डायरेक्ट डॉ. सतीश पाटील, डॉ. शारीक गिरासे याचे आभार मानत डॉ सतीश पाटील गरिबांसाठी देवदूत ठरले असे मत स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.
सदर आर्थीक दुर्बळ घटकातील लोकांची उपचारासाठी होणारा त्रास पाहून डॉ. सतीश पाटील यांनी ओमकार हॉस्पिटल मध्ये गरीब व गरजू लोकांना सर्व शस्त्रक्रिया व उपचारासाठी सवलती करून देण्यात येईल अशी घोषणा केली.
आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांचे सवलतीत उपचार करण्यात येतील अधिक माहिती साठी "हमराही फाऊंडेशन" याच्या शी 8070705552 याना नंबर वर संपर्क साधावा असे मत डॉ. भालेराव यांनी व्यक्त केले
No comments:
Post a Comment