भिवंडीतील नारपोली पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, घरफोडी करणाऱ्या टोळीकडून केला ९० लाखांचा मुद्देमाल हस्तगत !!
भिवंडी, दिं,३, अरुण पाटील (कोपर) :
ठाणे जिल्ह्यात सर्वात सक्रिय पोलीस ठाणे असलेल्या भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे घडत असून नारपोली पोलीस त्यांचा पाठपुरावा करून गुन्हे उघडकीस आणत आहेत. अश्याच प्रकारे नारपोली पोलीसानी तीन घडलेल्या गुन्ह्यांत कसुन तपास करून पाच आरोपीना ताब्यात घेऊन त्यांच्या कडून ९० लाख ४ हजर ११०रू किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
सविस्तर हकीगत अशी की, दिं, १६/१२/२०२१ ते १७/१२/२०२१ दरम्यान नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रेरणा कॉम्पलेक्स येथे अज्ञात चोरट्यानी बंद गोडाऊणचे लोखंडी शटर तोडून गोडाऊन मधील १६ लाख ९३ हजार रू. किंमतीचा १४ टन ५०० किलो वजनाचा प्लास्टिक दाण्याचा माल चोरून नेला होता.
तसेच कृष्णबाई येथे दिं, १२/२/२०२२ रोजी ते पहाटेच्या दरम्यान पियू केम इपेक्स प्रा. ली.या कंपनीचे गळाक्र. ४,५,६, ए -विंग, क्रिष्णा बाई कपाउंड, वळगावं येथून अज्ञात चोरट्याने शटरचे कुलूप लावण्याचे क्लिप कट करून शटर उघडून त्याद्वारे प्रवेश करून गोडाऊन मधील १९ लाख ७६ हजार ५५५ रू. किंमतीचा वेगवेगळ्या कंपनीचे केमिकल पावडरचा माल चोरून नेला होता.
तर दिं, ५/२/२०२२ रोजी ते पहाटेच्या दरम्यान सुप्रीम इंडस्ट्रीज ली. गोडाऊन नं, डी-३ ते डी-७, श्री. साई सद्गुरू कंपाउंड, राहनाळ गाव, येथील गोडाऊनच्या भिंतीला होल पाडून त्याद्वारे गोडाऊन मध्ये प्रवेश करून ६ लाख ५० हजार १८० रू. किंमतिचा प्लस्टिक दाण्याचा माल अज्ञात चोरट्याने नेला होता.
या चोरीबात नारपोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल होताच पोलिसांनी गुप्त बातमीदारा मार्फत व तांत्रिकदृष्ट्या कसून तपास करून या गुन्ह्यातील घरफोडी करणारे (१) मोहंमद सिकंदर उर्फ शारुख मुस्तकीन चौधरी, (वय-२१ वर्ष, रा. सलीम शेठची चाल, पेल्हार गाव, वसई -पालघर), (2) परवेज मकसूद आलम खान (वय -३९, रा. बलिठा, वापी -गुजरात), (३)जाकीर जाहिद खान, (वय -३१, बलिठा, वापी -गुजरात ), (४) लोकेश हेमराज बोरा, (वय -४०, पटेल कंपाऊंड, बहिणीच्या घरी, भिवंडी), (५) सलीम अहमद जब्बार अहमद अन्सारी (रा -४७, गांधीनगर -तडगल्ली, मुंबई) यांना शिताफीने ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यानी तीन गुन्हे केल्याचे कबूल केल्याने त्यांच्या कडून वरील वर्णनाचा किंमतीचा माल व दोन आयशर टेंम्पो असा ९० लाख ४ हजार ११०रू किंमती मुद्देमाल जप्त केला.
सदर कारवाई भिवंडीचे मा. पोलीस उपायुक्त श्री. योगेश चव्हाण, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त श्री.प्रशांत ढोले, (पूर्व विभाग-भिवंडी) यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. मदन बल्लाळ, यांनी आपल्या पथकातील पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. संभाजी जाधव, सहा. पोलीस निरीक्षक श्री. चेतन पाटील, सहापो उप निरीक्षक/ श्री. धिवार, पो. ह./ सातपुते, पोना /विक्रम धडवई, पोना/ चव्हाण, पोना/ जाधव, पोना/ पाटील, पोना /सोनगिरे, पोशि /बंडगर, पोशि /ताठे यांनी केली आहे.

No comments:
Post a Comment