Wednesday, 2 March 2022

पंचायत राज "राज्य मंत्री " कपील पाटीलांनी मुस्कानला धीर देत सांगितलेकी "सरकार तुला लवकरच मायदेशी आणणार"

पंचायत राज "राज्य मंत्री " कपील पाटीलांनी मुस्कानला धीर देत सांगितलेकी "सरकार तुला लवकरच मायदेशी आणणार" 


भिवंडी, दिं,2, अरुण पाटील (कोपर) :
                रशिया आणि युक्रेनमधील युद्धाच्या सहाव्या दिवशीही युद्धजन्य स्थिती असताना वैद्यकीय क्षेत्रात शिक्षण घेत असलेले अनेक भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. त्यातच चार दिवसांपूर्वी भिवंडीची मुस्कान शेख या विधार्थिनीचा व्हिडिओ समोर आला होता. युक्रेनमध्ये अडकलेल्या मुस्कानशी केंद्रीय " पंचायत राज " राज्यमंत्री कपिल पाटील  यांनी संवाद साधत लवकरच सुखरूप मायदेशी परत आणण्यात येणार असल्याचे तिला धीर देत सांगितले आहे.
                  ठाणे जिल्ह्यातील ३७ विद्यार्थी युक्रेनमधील युद्धात अडकून पडले होते. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी लोकसभा मतदारसंघातील ५ विद्यार्थी आहेत. भिवंडी शहरातील प्रतीक संतोष चव्हाण, भिवंडी तालुक्यातील पडघा येथील मुस्कान फिरोज शेख हिच्यासह शेजल वेखंडे, झोया फिरोज शेख आणि टिटवाळ्यातील राजेश अग्रवाल असे विद्यार्थ्यांची नावे आहेत.
           हे सर्व विध्यार्थी एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षांचे शिक्षण युक्रेनमधील कीव शहरात घेत होते. ५ पैकी ४ विद्यार्थी सुखरूप घरी पोहचले. मात्र, प्रवासात या विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे मुस्कान अद्यापही तिथेच अडकून पडली आहे. त्यामुळे, तिला मायदेशी आणावे याकरिता केंद्र आणि राज्य शासनाने प्रयत्न करावे, अशी मागणी मुस्कानच्या आई आणि मामेभावाने तीन दिवसांपूर्वी केली होती.
               युक्रेन रशिया युद्धाचा सर्वाधिक फटका भारतातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्यांना बसला आहे. युक्रेनमध्ये तब्बल २० हजार विद्यार्थी युद्धमुळे अडकून पडले असताना भारत सरकारने मिशन गंगा मोहीम राबवून भारतीय विद्यार्थ्यांना भारतात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी आपल्या भिवंडी लोकसभा मतदार संघातील पडघा येथील मुस्कानसोबत संवाद साधून तिला धीर देत भारत सरकार सर्व विद्यार्थ्यांना सुखरूप माघारी आणणार असून त्यासाठी धीर धरावा व तोपर्यंत स्वतःची काळजी घ्यावी, असे कपिल पाटील यांनी मुस्कानसोबत मोबाईल व्हिडिओ संवादा दरम्यान सांगितले.
              केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मुस्कानला फोन करून धीर दिल्याची महिती कुटुंबीयांना कळताच कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केला आहे. सर्वांच्या सदिच्छा व आशीर्वादामुळे आपली मुस्कान सुखरूप परत घरी येईल, असा विश्वास मुस्कानच्या नातेवाईकांनी व्यक्त केला.

No comments:

Post a Comment

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!!

६३ वा नागरी संरक्षण व होमगार्ड्स संयुक्त वर्धापन दिन (सप्ताह) सांगता समारोप एचिव्हर्स कॉलेज, कल्याण येथे उत्साहात !!! कल्याण प्र...