Wednesday, 2 March 2022

जादूटोणा करण्याच्या बहाण्याने गँगरेप ! पालघर जिल्ह्यातील धक्कादायक घटना !!

जादूटोणा करण्याच्या बहाण्याने गँगरेप ! पालघर जिल्ह्यातील धक्कादायक घटना !!


वसई, बातमीदार : पालघर जिल्ह्यातील नालासोपाऱ्यात राहणाऱ्या 20 वर्षीय महिलेला दोन आरोपींनी चाळीतील एका घरामध्ये जादूटोणा करण्याच्या बहाण्याने आळीपाळीने बलात्कार करून गँगरेप केला आहे. आरोपी मौलाना रज्जब शेख आणि शहाबुद्दीन या दोघांनी पीडित महिलेला काळी जादू उतरवतो असे सांगून जादूटोणा करण्याच्या बहाण्याने तिच्या शरीरावरील कपडे काढून बलात्कार केला आहे.

महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात नालासोपारा येथील 20 वर्षीय महिलेवर जादूटोणा करण्याच्या बहाण्याने बलात्कार करून तिला धमकावल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मौलाना रजब शेख आणि शहाबुद्दीन शेख या प्रकरणी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत वसई तालुक्यातील नालासोपारा येथील चाळीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार झाला असल्याचे सांगितले. यादरम्यान आरोपींनी पीडित महिलेला तिच्यावर कोणीतरी काळी जादू केल्यामुळे तिला त्रास होत आहे असे सांगितले. यानंतर पीडित महिलेने त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्या सूचनांचे पालन करण्यास सहमती दर्शविली.

तिला जादूटोणा करून बरे करण्याच्या बहाण्याने आरोपींनी तिला सांगितले की, आपण काही जादूटोणा करत आहोत. नंतर त्यांनी तिला कपडे काढण्यास सांगून तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. यानंतर पीडित महिलेने पालघर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेऊन आरोपी विरोधात बलात्कार आणि धमकावल्याबद्दल भारतीय दंड संहिताच्या कलम 376 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली मात्र दोघे आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेले. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक वेगाने हलवून त्या दोन आरोपींना अखेर बेड्या घातल्या. तसेच पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


No comments:

Post a Comment

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !!

गेल ओम्वेट आणि भारत पाटणकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित माहितीपट 14 डिसेंबरला कोल्हापूरमध्ये प्रदर्शित !! ** Gail & Bharat (2025) दिग्दर...