Friday, 18 March 2022

शेरे गावातील किशोर पंडित यांच्या शेतात लावलेली फळझाडे अज्ञात्याने नेली चोरून, पोलिसांत करणार तक्रार !

शेरे गावातील किशोर पंडित यांच्या शेतात लावलेली फळझाडे अज्ञात्याने नेली चोरून, पोलिसांत करणार तक्रार !


कल्याण, (संजय कांबळे) : शहापूर तालुक्यातील शेरे गावात राहणारे किशोर मंगल पंडित यांनी त्यांच्या वनविभागाने  दिलेल्या जमिनीत लावलेली विविध प्रकारची फळझाडे कोणी अज्ञाताने खणून नेली असून आज ते सकाळी शेतावर गेले असता हा प्रकार समोर आला आहे. या विरोधात ते पोलीस ठाण्यात तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.


तालुक्यातील शेरे हे गाव मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे चर्चेत आले आहे. याच गावात राहणारे सामाजिक कार्यकर्ते किशोर मंगल पंडित हे मोलमजुरी करून कुंटूबाचा उदरनिर्वाह करत आहेत. त्यांचे आईवडील मंगल पंडित व व्दारकाबाई पंडित यांना कसण्यासाठी व उदरनिर्वाहासाठी वन विभागाने शेरे शेंद्रूण रस्त्याशेजारील गट नं ६४८ पैकी ३०:९८:० यातील सुमारे २० गुंटे च्या आसपास जमीन क्षेत्र यांना दिले आहे. यामध्ये त्यांचा मुलगा किशोर म़गल पंडित व त्यांची पत्नी श्रीमती माधुरी किशोर पंडित यांनी आंबा, नारळ, चिकू, शिताफळ, पेरू आणि बांबू अश्या वृक्षांची लागवड मागील पावसाळ्यात केली होती. हे दोघे व त्यांची मुलं या झाडांची पोटच्या मुलाप्रमाणे काळजी घेत होते. चिकू झाडाला फळे आली होती तर आंब्याच्या झाडाला मोहर आला होता. दोनच दिवसापूर्वी माधुरी पंडित हिने शेतावर जाऊन फळझाडांची पाहणी केली होती.


आज होळी धुलीवंदनाची सुट्टी असल्याने सकाळी किशोर पंडित हे शेतावर गेले असता,कोणीतरी अज्ञाताने ही झाडे मुळासकट खणून नेल्याचे लक्षात आले. त्यामुळे त्यांना धक्काच बसला. साधारण पणे १५/२०फळझाडे होती असे किशोर पंडित यांनी सांगितले. या संदर्भात आपण पोलिसांत तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच ज्यांनी कोणी हे कृत्य केले ते चांगले केले नाही असेही ते म्हणाले.


No comments:

Post a Comment

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!

महाराष्ट्र दिनानिमित्त साकेत मैदानावर नागरी संरक्षण दलाचे दिमाखदार संचलन !!  ***    १०५ हुतात्म्यांना मानवंदना; स्वयंसेवकांच्या शिस्तबद्ध का...