पंजाब नंतर आता गुजरात व हिमाचल प्रदेश निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार-- आम आदमी पार्टी.
भिवंडी, दिं,१०, अरुण पाटील (कोपर) :
आम आदमी पार्टीने दिल्लीतील विकास कामांच्या जोरावर पंजाबमध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. दिल्ली, पंजाबनंतर आता आम आदमी पार्टीचं गुजरात आणि हिमाचल प्रदेश निवडणुकीवर लक्ष केंद्रित करणार आहे. यासाठी पक्षानने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. गुजरात हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड आहे. त्यामुळे गुजरातमध्ये सत्तेसाठी रणनिती आखली जात आहे. त्याच बरोबर अशियातील सर्वात मोठा अर्थसंकल्प असलेल्या महानगरपालिका निवडणुकाचाही विचार सुरु असल्याचं सांगण्यात येत आहे.
गुरुवारी बोलताना आम आदमी पार्टीचे नेते अक्षय मराठे म्हणाले की, ‘आम्ही गुजरात आणि हिमाचल प्रदेशात नक्कीच निवडणूक लढवणार आहोत. ही दोन राज्ये आमच्या रडारवर असून पक्ष कार्यकर्त्यांना या राज्यांमध्ये पाठवत आहे. त्याचा निश्चितच मोठा परिणाम होईल.” आपचे नेते अक्षय मराठे पुढे म्हणाले की, “अनेक दशकांपासून भारतातील जनतेला दोनच पक्षांपैकी एकाची निवड करायची होती. या दोन्ही पक्षांनी त्याच्यासाठी काम केलेले नाही. जनतेला प्रथमच पर्याय दिसत आहे. लोकांना बदल हवा आहे.
दुसरीकडे, मुंबई महानगरपालिकेबाबतही आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसात मुंबईत अनेक गैरव्यवहाराची प्रकरने समोर आली आहे. त्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी मुंबईत निवडणुकीसाठी जोर लावावा, अशी मागणी कार्यकर्ते करू लागले आहेत. या लोकांना सक्षम पर्याय हवा असल्याचं त्यांनी सांगितलं. पंजाबमधील विजयानंतर मुंबईतही जल्लोष करण्यात आला. यावेळी पक्ष कार्यकर्त्यांचा आत्म विश्वास वाढल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. आम आदमी पार्टी मुंबई या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याचं पोस्टर देण्यात झलकवण्यात आले आहे. दिल्ली बदली, अब मुंबई की बारी! असं त्यावर लिहिण्यात आलं आहे.
हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये भाजपाची सत्ता आहे. तर मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात आम आदमी पार्टी कशी रणनिती आखते, याकडे कार्यकर्त्यांचा लक्ष लागून आहे.

No comments:
Post a Comment