Friday, 4 March 2022

भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी केली कोपर येथील सरकारी खाजणं जमिनीची पाहणी व घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून !!

भिवंडीचे तहसीलदार अधिक पाटील यांनी केली कोपर येथील सरकारी खाजणं जमिनीची पाहणी व घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकून !!

( भिवंडी तालुक्यातील कोपर गाव येथे मे.अद्रिका डेव्हलोपर्स या बांधकाम व्यवसायिकाने पत्र्याचे कंपाऊंड टाकून शेतकऱ्यांना व कब्जेदारांना शेती करण्यास केला मज्जाव. संतप्त शेतकऱ्यांचे गेटजवळ केले धरणे आंदोलन )


भिवंडी, दिं,४, अरुण पाटील (कोपर) :
          भिवंडी तालुक्यातील तलाठी सजा -काल्हेर अंतर्गत येत असलेल्या  कोपर गाव  येथे सद्या मोठ्या प्रमानावर मे. अद्रिका डेव्हलोपर्स प्रा. ली. या कंपनीचे रहिवाशी इमारतीचे टॉवरचे बांधकाम सुरु आहे. मात्र या बांधकामा दरम्यान सदर कंपनीने पूर्ण परिसरातच  पत्र्याचे कपाऊंड टाकल्याने तेथील शेतकऱ्यांना व कब्जेदारांना त्या ठिकाणी शेतीकारण्यास जाता येत नाही.तसे कंपनीने तेथील नैसर्गिक खाडी नाल्यात मोठया प्रमावर माती, दगड भरणी केल्याने पावसाळ्यात कोपर गावात पुरसदृश्य स्थती निर्माण होण्याची शक्यते बाबत कोपर ग्रामपंचायतिने सदर कंपनीला पत्र देऊन  केलेली भरणी काढण्यास सांगितले आहे. मात्र आजपर्यंत नैसर्गिक खाडी नाल्यातील भरणी काढण्यात आलेली नाही. त्यामुळे भविष्यात सदर नाल्यावर टोलेजंग इमारती  बांधल्या जण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


          या कोपर गावातील शेतकरी अथवा कब्जेदार शेती करण्यास गेल्यास सदर कंपनी त्यांच्यावर दादागिरी करून त्यांना दमदाटी करून पोलीस ठाण्यात खोट्या केसेस दाखल करण्याची  धमकी देत असल्या कारणाने भयभीत झालेल्या शेतकरी सद्या तणावाखाली जगत आहे.तसेच सदर कंपनीने तेथील सरकारी खाजणं जमिनीवर अतिक्रमण करून आपल्या कब्जात घेतल्याचा संशय ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे.
          तसेच येथील सरकारी खाजणं जमिनीवर अतिक्रमण व कब्जा सदर्भात महसूल खाते भिवंडी यांना तक्रारी अर्ज प्राप्त झाल्याने व येथील  शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्याया विरोधात कोपर गावचे शेतकरी श्री. विनोद आत्माराम पाटील यांनी विविध महसूल कार्यालयात तक्रारी अर्ज केल्याने  विविध तक्रारीच्या अनुशंगाने भिवंडीचे तहसीलदार श्री. अधिक पाटील यांनी आज शुक्रवार रोजी (दिं. ४/३/२०२०) कोपर गाव येथील मे. अद्रिका डेव्हलोपर्स या ठिकानी भेट देण्यासाठी आले होते. तेंव्हा तेथे त्या ठिकानी सुरु असलेले काही बांधकाम हे सरकारी खाजणं जमिनीवर असून व इतर सरकारी खाजणं जमिनीवर अतिक्रमण करून कब्जा केल्याचे निदर्शनास आणून दिले.
        मा. तहसीलदार साहेब येणार असल्याची माहिती संबंधित शेतकऱ्यांना मिळाली असता सर्व शेतकरी मा. तहसीलदार साहेबाना भेटायला येणार असल्याची कुणकुण मे. अद्रिका डेव्हलोपर्स कंपनीला माहिती मिळताच कंपनीने कोपर गवाजवळील पत्रा कपाउंडचा मुख्य गेट बंद करून कोपर गावातील शेतकऱ्यांना मा. तहसीलदाराची भेट घेण्यास मज्जाव केला. मात्र गावातील इतर शेतकाऱ्यांनी व महिलांनी इतर मार्गानी येऊन मा. तहसीलदार श्री. अधिक पाटील साहेबांची भेट घेऊन आपली व्यथा मांडली.  
           ऐनवेळी आलेल्या विषयाबाबत मा. तहसिलदार पाटील साहेबांनी काही जमलेल्या शेतकऱ्यांची व्यथा ऐकून त्यांना योग्य मार्गदर्शन करून निवेदनाद्वारे आपली बाजू मंडण्याचा सल्ला दिला. त्या नंतर आपल्या निवेदनाच्या अनुशंगाने योग्य ती कारवाई नक्की करू अशी ग्वाही दिली. त्यामुळे येथे जमलेल्या शेतकऱ्यांच्या आशा पाल्लवीत होऊन  दिलासा मिळाला आहे.
       मात्र त्या नंतरही जर आम्हा शेतकऱ्यांनवर होणारा अन्याय  "न" थांबल्यास व योग्य न्याय "न" मिळाल्यास आम्ही आमरण उपोषण करू अशी माहिती तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांसमोर दिली.

2 comments:

  1. Chagala kam karta saheb asch shetakarana madat karat ra dhanawad


    👌👌👌👌👌👌

    ReplyDelete

ह.वि. पाटील हायस्कूलमध्ये कायदेविषयक व सुरक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न !!

ह.वि. पाटील हायस्कूलमध्ये कायदेविषयक व सुरक्षा मार्गदर्शन सत्र संपन्न !! चिंचघर | प्रतिनिधी ह.वि. पाटील हायस्कूल, चिंचघर येथे सख...