शासकीय विश्राम गृह माणगाव येथे २८ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी दक्षिण रायगड जिल्हा नुतन कार्यकारिणीच्या मुलाखतींचे आयोजन !!
बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद यांना सूचीत करण्यात येते की, दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारणी सर्व पदाच्या मुलाखती २८ एप्रिल रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत माणगाव शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आल्या आहेत.
या संदर्भात दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आजी-माजी पदाधिकारी सभासद यांना सूचित करण्यात येते की, भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्हा विचारात घेतला असता यामध्ये 15 तालुके येतात आणि जिल्ह्याचा कारभार सुरळीत तसेच मोठ्या प्रमाणात होण्याकरिता रायगड जिल्ह्याचे रायगड दक्षिण आणि उत्तर अशा दोन विभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा दक्षिण विभाग जिल्हा कार्यकारणी तयार करण्या संदर्भात मुलाखती दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी, वेळ दुपारी ०१ ते ०३, ठिकाण माणगांव शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या असून सदर मुलाखती करिता प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे उपस्थित राहणार असून रायगड जिल्हा दक्षिण मधील पोलादपूर, महाड, माणगांव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन, मुरुड, रोहा. या तालुक्यांमधून "रायगड जिल्हा दक्षिण" जिल्हाकार्यकारणी तयार करण्यात येणार असून सदर निवड थेट मुलाखती मार्फत होणार असून "अध्यक्ष रायगड जिल्हा दक्षिण, जिल्हा उपाध्यक्ष, महासचिव, संघटक तसेच इतर जिल्हा पदांकरिता होणार असून इच्छुक उमेदवारांनी सदर मुलाखतीस येताना आपले परिचय पत्र घेऊन येणे. असे अॅड. प्रियदर्शी तेलंग रायगड जिल्हा प्रभारी वंचित बहुजन आघाडी यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment