Saturday, 2 April 2022

बारावेगाव येथे जागेच्या वादातून ताईबाई मिरकुटे या महिलेस जबर मारहाण !! "ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्तांचे अनधिकृत बांधकामाला अभय"

बारावेगाव येथे जागेच्या वादातून ताईबाई मिरकुटे या महिलेस जबर मारहाण !!

"ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्तांचे अनधिकृत बांधकामाला अभय"


कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या ब प्रभाग क्षेत्र अंतर्गत येत असलेल्या बारावेगाव येथे ताईबाई मिरकुटे या महिलेस जमिनीच्या वादातून जबर मारहाण करण्यात आली आहे. 


संतोष कोयते व ताईबाई मिरकुटे यांच्या जागेत महेंद्र देसाईकर याने बेकायदेशीरपणे अतिक्रमण करून अनधिकृत इमारतीचे आरसीसी बांधकाम व बोअर वेल घेतली आहे. कब्जे कुळवहिवाटीच्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर बांधकाम केल्याने संतोष कोयते व ताईबाई मिरकुटे या जाब विचारण्यास गेले असता महेंद्र देसाईकर व त्याच्या कुटुंबीयांनी ताईबाई मिरकुटे या महिलेस जबर मारहाण केली. जखमी ताईबाई यांना रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले असून येसूबाई देसाईकर, पिंकी मिरकुटे, अपर्णा देसाईकर, पिंट्या देसाईकर, महेंद्र देसाईकर, गौरी देसाईकर यांच्याविरोधात भा द वि 354, 354 ए, 509, 324, 323, 506, 143, 147, 149, 427, प्रमाणे खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


*सहाय्यक आयुक्तांचे दुर्लक्ष*

संतोष कोयते व ताईबाई मिरकुटे यांच्या जागेत महेंद्र देसाईकर याने बेकायदेशीर अनधिकृत बांधकाम सुरू केल्याची तक्रार ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त यांच्याकडे वारंवार करण्यात आली होती परंतु सहाय्यक आयुक्त ठाकूर यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करता या अनधिकृत बांधकामास पाठीशी घातल्याचा आरोप संतोष कोयते व ताईबाई मिरकुटे यांनी केला आहे. ब प्रभाग क्षेत्र सहाय्यक आयुक्त यांनी अनधिकृत बांधकामांवर वेळीच कारवाई केली असती तर दोन कुटुंबीयांमध्ये वाद होऊन ताईबाई मिरकुटे यांना मारहाण झालीच नसती असा आरोप कोयते व मिरकुटे कुटुंबीयांनी केला आहे. वादग्रस्त अनधिकृत बांधकामावर कारवाई न झाल्यास कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर उपोषण करणार असल्याचे संतोष कोयते यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे.

No comments:

Post a Comment

*गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती*

*गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती* मुंबई, (पी.डी.पाटील) : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या मराठा समाजातील ज्या पालकांची मु...