Friday, 1 April 2022

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी.अधिकाऱ्यावर लाच मगितल्याचा आरोप करणारा प्रभाकर साईलचा हृदय विकाराने मृत्यू !!

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात एन.सी.बी.अधिकाऱ्यावर लाच मगितल्याचा आरोप करणारा प्रभाकर साईलचा हृदय विकाराने मृत्यू !!


भिवंडी, दिं,२, अरुण पाटील (कोपर) :
           कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील एनसीबीचे पंच आणि साक्षीदार प्रभाकर साईल यांचे रात्री उशिरा निधन झाले. साईलचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील माहुल भागातील त्यांच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने प्रभाकर यांचे निधन झाले. प्रभाकर साईल यांचे पार्थिव आज त्याच्या अंधेरी येथील दुसऱ्या निवासस्थानी नेण्यात आले होते. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी प्रभाकर यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे आणि केपी गोसावी यांच्यावर २५ कोटींची लाच घेतल्याचा आरोप केला होता.
            त्यांच्या आरोपानंतर या प्रकरणात एनसीबीची एसआयटी टीम दाखल झाली आणि समीर वानखेडे यांना या प्रकरणातून वेगळे करण्यात आले. प्रभाकर यांच्या आरोपाच्या आधारे महाराष्ट्र सरकारचे अल्पसंख्याक कल्याण मंत्री नवाब मलिक यांनीही समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले होते. प्रभाकर यांच्या मृत्यूनंतर आता पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत येऊ शकतो.
           आर्यन ड्रग्ज प्रकरणात प्रभाकर NCB चे स्वतंत्र साक्षीदार होते. छापेमारीच्या वेळी आपणही क्रूझवर उपस्थित असल्याचा दावा त्यांनी केला होता. प्रभाकर यांनी दावा केला होता की, एनसीबीने त्यांच्याकडून पंचनामा पेपर सांगून कोऱ्या कागदावर बळजबरीने सह्या करून घेतल्या होत्या. त्यांना आर्यन किंवा इतर कोणाच्या अटकेबद्दल माहिती नव्हती.
           प्रभाकर यांनी आरोप केला होता की, गोसावीला फोनवर डिसुझाकडून २५ कोटींच्या मागणीबाबत फोनवर बोलताना ऐकले होते आणि हे प्रकरण १८ कोटींवर निश्चित झाले होते. कारण त्यांना ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना द्यायचे होते.

No comments:

Post a Comment

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !!

नवी मुंबई मधील भूमीहिन शेतमजूर, मिठागर कामगार, बाराबलूतेदार यांना मिळाला न्याय ! मनोज कोळी, मयूर कोळी यांच्या पाठपुराव्याला यश !! ** मा. उच्...