Friday, 1 April 2022

दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान तयार करणार ! "महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी"

दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान तयार करणार !
"महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी"


कल्याण, बातमीदार : दिव्यांग खेळाडूंना सराव करण्यासाठी मैदान तयार करणार, असे आश्वासन महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आज दिले. दिनांक 23 मार्च ते 27 मार्च या दरम्यान महाराणा प्रताप खेलगाव उदयपूर येथे संपन्न झालेल्या एकविसाव्या पॅरा स्विमिंग नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये सहभागी होऊन उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या कल्याण डोंबिवली परिसरातील दिव्यांग खेळाडूंचा सत्कार करतेवेळी महापालिका आयुक्तांनी हे उद्गार काढले. उदयपूर मध्ये घेण्यात आलेल्या या पॅरा स्विमिंग नॅशनल कॉम्पिटिशन मध्ये एकूण 23 राज्यांनी आणि चारशे खेळाडूंनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये महाराष्ट्रातील 66 दिव्यांग खेळाडू सहभागी झाले होते, त्यापैकी 52 दिव्यांग खेळाडूंनी शंभराहून अधिक पदकांची लयलूट केली आहे.

महाराष्ट्रातील दिव्यांग खेळाडूंनी सर्वाधिक म्हणजे 386 पॉईंट मिळवून चॅम्पियन ट्रॉफी पटकावली आहे. कल्याण-डोंबिवली परिसरात वास्तव्य करणाऱ्या गीतांजली चौधरी, सिद्धी दळवी, रोशनी पात्रा, सानिया शेख, आर्यन जोशी हे दिव्यांग खेळाडू या स्पर्धेत सुवर्णपदक व कास्य पदकाचे मानकरी ठरले आहेत अशी माहिती त्यांच्या टिम मॅनेजर अर्चना जोशी यांनी दिली. या कौतुक सोहळ्यासमयी महापालिकेच्या शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली व या खेळाडुंचे पालक उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

विकसित भूखंड द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू रहाणार - कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे.

विकसित भूखंड द्या, अन्यथा बेमुदत आंदोलन सुरू रहाणार - कॉम्रेड रामचंद्र म्हात्रे. उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : सिडको भवन येथील प...