' दि बुद्धिस्ट युथ ' लोढा हेवन -पलावा यांच्या मार्फत महापुरुषांची संयुक्त जयंती !
डोंबिवली, हेमंत रोकडे : सर्व तरुण लोढा हेवन -पलावा, डोंबिवली पूर्व विभागात बुद्धिस्ट तरुण तरुणी विचार एक झाले आणि त्या तरुण मुलांनी एकत्र येऊन 'दि बुद्धिस्ट युथ' संघटना स्थापन केली. सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता सर्व तरुण तरुणी एकत्र येऊन प्रत्येक समाजासाठी, विभागासाठी काहीतरी करायचे आहे हा दृष्टीकोन ठेऊन काम करायचे असे संघटनेचे उद्दिष्ट आहे.
त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 23/04/2022 रोजी महापुरुषांची संयुक्त जयंती साजरी करताना विभागात निबंध स्पर्धा घेतल्या तसेच लोढा हेवन मधील रुबी हॉस्पीटल डॉ. प्रणय टेंभुर्णे यांच्या सहकार्याने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरात विभागातील अनेक तरुणांनी रक्तदान केले आणि महापुरुषांना अभिवादन केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करताना महापुरुषांना अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रत्येक मुलांनी खूप मेहनत घेतली.
सामाजिक भान ठेऊन स्वच्छता, सुसूत्रता तसेच थोर व्यक्तींचा सन्मान, उपस्थितांचे विशेष आभार मानण्यात आले. जयंतीच्या संध्याकाळी सिद्धार्थ महाविद्यालयाचे प्राचार्य विजय मोहिते यांचे प्रबोधन ठेवण्यात आले होते. तसेच 'मानवंदना भीमाला' हा भीम गीतांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमाच्या शेवटी समाजसेवक शामराव यादव यांनी मलकप्रित सिंग सैनी या अपघातामध्ये अपंग झालेल्या व्यक्तीस इलेक्ट्रिक थ्री विलर स्कूटर दिली. दि बुद्धिस्ट युथ या संघटनेमधील प्रत्येक व्यक्ती सम विचारी व सुशिक्षित आहे सर्वांनी कार्यक्रम खूप सुंदर नियोजन करून पार पाडला. हे पहिले वर्ष असून त्यांची तळमळ समाज्यासाठी, विभागासाठी आणि सर्वांनी एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची जिद्द असून दि बुद्धिस्ट युथ पुढे ही असेच विभागात समाजहिताची कामे करत राहणार असे तरुणांनी सांगितले.
No comments:
Post a Comment