Thursday 28 April 2022

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शिवसेना शाखा क्र.१५ आणि १७ तर्फे ई-श्रम कार्ड शिबीरचे आयोजन !!

असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शिवसेना शाखा क्र.१५ आणि १७ तर्फे ई-श्रम कार्ड शिबीरचे आयोजन !!


मुंबई, (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :

             सरकारच्या योजनांचा फायदा थेट असंघटीत क्षेत्रातील कामगारांना मिळण्यासाठी केंद्र सरकारकडून ई-श्रम कार्ड ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. देशात या क्षेत्रात काम करणाऱ्या  कामगारांची संख्या मोठी आहे. यात स्थलांतरीत होणाऱ्या  कामगारांचा मोठा समावेश आहे. अशा कामगारांना केंद्र सरकारकडून काही सुविधा देण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील काही सेवा देण्याचा सरकारचा विचार आहे. यासाठी अशा कामगारांचा डेटाबेस तयार करण्याचे काम केंद्र सरकार करत आहे.याचा फायदा सर्व सामान्यांना मिळावा या हेतूने असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी शिवसेना शाखा क्र.१५ आणि १७ तसेच श्री साई दर्शन मित्र मंडळ, शिवबा मित्र मंडळ, महाराष्ट्र रिक्षा चालक सेना, जय हनुमान रिक्षा चालक सेना यांच्या संयुक्त विद्यमाने प्रमेय वेल्फेअर फॉउंडेशन तर्फे रविवार  दि. १ मे २०२२ रोजी सकाळी १० ते ५ या वेळेत शिवसेना शाखा क्र.१७, दयानंद भंडारी चाळ, एस. बी. आय बँक समोर, चिकूवाडी, बोरिवली (पश्चिम) येथे ई-श्रम कार्ड शिबीरचे आयोजन करण्यात आले आहे.

ई-श्रम पोर्टल महत्वाचे कागदपत्रे-

आधार क्रमांक, आधार क्रमांक लिंक मोबाईल नंबर, बचत बँक खाते क्रमांक IFSC कोड,
रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला, पत्त्याचा पुरावा,
वयाचा पुरावा (१८ ते ५९ दरम्यान),पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, पात्रता, मोबाईल नंबर आदी ची गरज आहे. 

सरकार दरवर्षी अर्थसंकल्पात गरींबासाठी योजनांची घोषणा करत असते. मागील वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने ई-श्रम कार्डची घोषणा केली होती. हे कार्ड बनविण्याची प्रत्यक्षात सुरूवात २६ ऑगस्ट २०२१ मध्ये झाली. यासाठी सरकारकडून व्यापक मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे. असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी या योजनेची सुरूवात सरकारकडून करण्यात आली. या कार्डाच्या माध्यमातून कामगार सरकारी योजनांचा लाभ घेवू शकतात. या सध्या सुरू असणाऱ्या  आणि भविष्यातील योजनांचा यात समावेश असेल. पोर्टलवर नांदेणी केल्यानंतर बारा अंकाचा एक युनिक नंबर देण्यात येतो. नोंदणी केलेल्यांना दोन लाखाच्या अपघात विम्याची सोय सरकारकडून करण्यात येते. तरी असंघटित कामगारांनी  मोठया संख्येने या कार्यक्रम मध्ये सहभागी व्हावे असे आवाहन उपविभाग प्रमुख दामोदर म्हात्रे, शाखा प्रमुख श्री. सुनिल पाटील, शाखा प्रमुख श्री सचिन म्हात्रे शिवसेना शाखा १५ आणि  १७ च्या महिला -पुरुष, युवा पदाधिकारी, सदस्य आणि तमाम शिवसैनिक यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...