Tuesday, 26 April 2022

शिवशंकर विद्यालय आणि न्यू इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स वस्तूंचे वितरण !!

शिवशंकर विद्यालय आणि न्यू इंग्लिश शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट्स वस्तूंचे वितरण !!


मुंबई, (शांताराम गुडेकर) :

         आजची तरुण पिढी ही देशाचं भवितव्य आहे हे लक्षात घेऊन प्रत्येक तरुणाने उत्तम शिक्षण घ्यावं आणि देशहिताचे कार्य करावे या हेतूने मुंबईतील सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने मुंबईसह ग्रामीण भागातील गरजू शाळांतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वस्तू वितरण केल्या जात आहे. पुणे, सातारा, रायगड, ठाणे जिल्ह्यात सत्कर्म फाऊडेशन च्या मार्फत उपक्रम घेण्यात आले आहेत. नुकतेच सत्कर्म फाऊंडेशनच्या वतीने संचालक ॲडव्होकेट अनुज नरूला आणि संचालक दत्तात्रय सावंत यांच्या मार्फत शिवशंकर विद्यालय तळेघर ता.आंबेगाव पुणे, न्यू इंग्लिश स्कूल जांभोरी येथील सर्व शालेय विद्यार्थ्यांना शालेय स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन एल बी लांघी, महाराष्ट्र वाहतुक सेनेचे अशोक टाव्हरे, धनंजय मेंगडे, एस डी मुलानी सर, हनुमंत टाव्हरे ,जयवंत मेंगडे, गणेश मेंगडे, मुक्तदेवी संस्थेचे तारामती भागीत व कार्यकर्ते उपस्थिती होते.

No comments:

Post a Comment

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी.....

नालासोपारात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब  ठाकरे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी..... नालासोपारा, प्रतिनिधी ता, २३ :- शिवसेना मुख्य...