Thursday 28 April 2022

युपीत भोंगे हटवल्याबद्दल 'राज ठाकरेनीं केले योगीं'चे कौतुक, महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'-- राज ठाकरे.

युपीत भोंगे हटवल्याबद्दल 'राज ठाकरेनीं केले योगीं'चे कौतुक,
महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी'-- राज ठाकरे. 


भिवंडी, दिं,२८, अरुण पाटील (कोपर) :

          मशिदीवरील भोंग्यांवरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार विरूध्द मनसे आणि भाजप असा राजकीय वाद रंगला आहे. राज ठाकरेंच्या घोषणेचं लोण देशभर पसरलं आहे. उत्तर प्रदेश सरकारने 30 एप्रिलपर्यंत बेकायदा लाऊडस्पीकर हटवण्याचे निर्देश दिले आहेत.


           सरकारच्या आदेशावरून प्रशासनाने राज्यातील अनेक जिल्ह्यांतील धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकर हटवले. योगी सरकारच्या या कारवाईचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कौतूक केले आहे. याशिवाय राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.


          राज ठाकरे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पत्रक प्रसिद्ध केले आहे. ''उत्तर प्रदेशातील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदिंवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार. आमच्या महाराष्ट्रात 'योगी' कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे 'भोगी' आहेत. महाराष्ट्र सरकारला सदबुद्धी मिळो हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना'', असे त्यांनी पत्रकात म्हटलं आहे .
            राज ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी 3 मेपर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. "मशिदीवरच्या भोंग्याचा आवाज बेसूर असतो. त्याचा कानांना त्रास होतो त्यामुळे भोंगे उतरवले पाहिजे. आम्ही आमची भूमिका मागे घेणार नाही. त्यामुळे मशिदीवरचे भोंगे उतरवले नाही तर हनुमान चालीसा लावणारचं. 3 मे पर्यंत मशिदीवरचे भोंगे उतरवा. आम्हाला कुठलाही तेढ निर्माण करायचा नाही.", असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले होते.
           महाराष्ट्रात सध्या भोंगा विरुद्ध हनुमान चालीसा असे चित्र दिसून येत आहे. मनसेने जिथे भोंगा वाजेल तिथे हनुमान चालीसा असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे राज्यात तणावाचे वातावरण आहे.

No comments:

Post a Comment

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे

कोणाही एका व्यक्तीची ही निवडणूक नसून पुर्ण देशाची आहे - श्रीकांत शिंदे  ** पुढील २० दिवसात देशांतर्गत व महाराष्ट्रात महायुतीची क...